नेवासा येथील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक इब्राहिमभाई मनियार यांचे वृद्धापकाळाने निधन

नेवासा येथील १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यातील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक इब्राहिमभाई सुलतानभाई मनियार
यांचे वृद्धापकाळाने मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास दुःखद  निधन झाले मृत्यूसमयी त्यांचे वय ९८ वर्षे होते.
   पैगंबरवाशी इब्राहिमभाई मनियार यांनी १९४२ च्या  स्वातंत्र लढयाच्या चलेजाव च्या चळवळीत  त्यांनी आंदोलनाद्वारे इंग्रजाविरुद्ध बंड पुकारले होते.त्यात त्यांनी कारावास ही भोगला होता.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी नेवासा होमगार्डच्या गृहरक्षक दलात काम केले तसेच राष्ट्रीय दलाचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम पाहिले. नेवासा तालुक्यात बांगड्याचा व्यापार ही त्यांनी केला.
इसवीसन पूर्वीचे विविध नाण्यांचा संग्रह करण्याचा छंद वाखाणण्याजोगा होता.
     शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी देशसेवा केली नेवासा तहसील प्रांगणात होणाऱ्या प्रजासत्ताक दिन,स्वातंत्र दिनाला तिरंग्याला मानवंदना देण्यासाठी वयाच्या ९८ वर्षी देखील ते सायकलवर येत होते.
     स्वातंत्र्य सैनिक इब्राहिमभाई मनियार यांच्या पच्यात इसाकभाई मनियार,जुबेरभाई मनियार,महंमदभाई मनियार ही तीन मुले व दोन मुली सुना,नातवंडे,पतवंडे असा मोठा परिवार आहे.नेवासा येथील ईदगाह मैदानाजवळील दफनभूमी मध्ये दुपारी शोककुल वातावरणात मनियार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. विविध संघटनेच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget