अवघ्या १२ दिवसात भाजपात गेलेले क्षिरसागर यांनी पुन्हा केला क्रांतिकारी पक्षात प्रवेश !

नेवासा,(प्रतिनिधी)
नेवासा तालूक्यातील भानसहिवरे येथील इंदिरा कॉंग्रेचे युवकनेते संदिपबाबा क्षिरसागर यांनी नेवासा येथील जाहिरसभेत भाजपात प्रवेश केला होता. अवघ्या १२ दिवसाचा कालावधी उलटत नाही तोच त्यांनी पुन्हा क्रांतिकारी शेतकरी पक्षात युवानेते प्रशांत गडाख यांच्या नेत्तृत्वाखाली पुन्हा प्रवेश केला आसून युवकनेते क्षिरसागर यांच्या प्रवेशाने क्रांतिकारी शेतकरी पक्षाची ताकद वाढली आहे.
 क्षिरसागर यांचे संघटन कौशल्य व वकृत्वावर मोठीभर आसल्याने त्यांची तोफ आता तालूक्यात दणानणार आसून त्यांच्या प्रवेशाने गडाखांना फायदा होणार आहे.क्षिरसागर यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपा व नंतर लगेच क्रांतिकारी पक्षात प्रवेश केल्यामुळे निवडणूकीचा जोर शेवटच्या टप्प्यात वाढत चालला आहे.यावेळी बोलतांना क्षिरसागर म्हणाले की,भाजपात मान सन्मान मिळत नाही सभेत बगलबच्चेच समोर दिवसात त्यामुळे माझी घुसमट होत होती गडाख कुटूंबिय माणूसकीचे मानस आसून त्यांच्या विजयासाठी आपण रणांगणात लढणार आसल्याचे सांगून गडाख विजयी होणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget