बोधेगाव येथे भाजपचे उमेदवार आ.मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ आ. सुरेश धस यांची सभा संपन्न

तो तर आमचा जुना गडी! आ.सुरेश धस

पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी | अमोल म्हस्के
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे शेवगाव पाथर्डीच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे यांच्या प्रचारार्थ आमदार श्री सुरेश अण्णा धस यांची बोधेगाव येथे  भाजपच्या उमेदवार मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आली होती.यावेळी आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, विरोधक खोटे बोल पण रेटून बोल अशी निती वापरून हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे असे भासवत आहे.परंतु शेतकऱ्यांचे खरं वाटोळे काँग्रेस,राष्ट्रवादीवाल्यांनी केली आहे.भारत देशात व महाराष्ट्र राज्यात सद्धा असणाऱ्या सरकारने काय सर्व सामान्य जनतेचे काय वाईट केले आहे.फक्त दादागिरी व  पैशावर राजकारण चालत नाही.तसेच मला या व्यासपीठावर नितिनराव दिसत नाहीत.तो तर आमचा जुना गडी आहे.पण अजुनही पक्षात आहे.काही गैरसमज झाले असतील तर दूर करु,सद्धा आपली भगिनी अडचणीत आहे.तीला साथ देणे गरजेचे आहे.असे म्हणत नितीनराव काकडे यांचे नाव न घेता आ.सुरेश धस यांनी सभेत बोलताच उपस्थित जनसमुदायातून टाळ्यांचा कडकडाट झाला.असे मत आ.सुरेश धस यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी भाजपचे उमेदवार आ.मोनिका राजळे यांनी सांगितले की मी कधीही विरोधकावर टिका केली.कोणाला अपशब्दही वापरला नाही.मी गेली पाच वर्षे  सर्व सामान्य जनतेत राहून समस्या जाणून घेऊन मतदार संघात काम केले आहे.यावेळी जि.प.सदस्य राहुल राजळे,ज्येष्ठ नेते काशिनाथ लवांडे पाटील,तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर,माणिकराव खेडकर,पाथर्डी नगराध्यक्ष मृत्यूजंय गर्जै,भिमराव फुंदे यावेळी असंख्य परीसरातील नागरिक नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आ.मोनिका राजळे यांनी बोधेगाव येथे मतदारांशी संवाद साधला पदाधिकारी, कार्यकर्ते ,ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget