शेतकऱ्याची मुलगी झाली तालुका कृषी अधिकारी. प्रतिभा कुताळ हीचे यश.

विसापूर
पिंपळगाव पिसा ता.श्रीगोंदा येथील प्रगतशील शेतकरी सुभाष नामदेव कुताळ यांची मुलगी प्रतिभा कुताळ ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या कृषी विभागाचे परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. 
     तिची तालुका कृषी अधिकारी पदासाठी निवड झाली आहे.प्रतिभा कुताळ हीचे वडील शेती व्यवसाय करतात.त्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत बेताची.तिचे प्राथमिक शिक्षण कुताळमळा या ठिकाणी दोन शिक्षकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले.त्यानंतर तिने पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण पिंपळगाव पिसा येथे घेतले.कुताळमळा ते पिंपळगाव पिसा हे चार किलोमीटर अंतरावर ती पायी प्रवास करत असे.पुढे अकरावी व बारावी शास्त्र शाखेचे शिक्षण श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयत तर बी.एस्सी.(कृषी)ची पदवी बारामती येथील कृषी महाविद्यालयातून घेतली.एम.एस्सी.(कृषी)चा अभ्यासक्रम राहुरी च्या महात्मा फुले विद्यापीठात पुर्ण केल्यानंतर तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रयत्न सुरु केले.मागील वर्षी ती शिरुर येथील वैद्यकीय व्यवसायीक डॉ.गवारी यांच्याशी विवाह बंधनात अडकली.तरीही ती सातत्याने प्रयत्न करत राहीली व त्यामध्ये ती यशस्वी झाल्याने तिचे  कौतुक होत आहे.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget