भूतलावरील दैवते असलेल्या आईवडिलांची शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करा-शिवाजी महाराज देशमुख

नेवासा(प्रतिनिधी)
ज्यांनी आपल्याला जग दाखविले अशा भूतलावरील दैवते असलेल्या आईवडिलांची शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करा असे आवाहन संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख हरिभक्त परायण गुरुवर्य शिवाजी महाराज देशमुख यांनी केले.
श्री क्षेत्र नेवासे येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे माजी विश्वस्त व वारकरी संप्रदायातील माऊली भक्त सेवेकरी स्वर्गवासी सदाशिवराव साळुंके यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते
यावेळी बोलतांना देशमुख महाराज पुढे म्हणाले की स्वर्गीय सदाशिवराव साळुंके हे माऊली भक्त व निष्काम कर्मयोगी होते वारकरी संप्रदायासाठी त्यांचे योगदान मोलाचे होते,बन्सी बाबांच्या बरोबर राहून त्यांनी माऊलींची कर्मभूमी असलेल्या या स्थानाची महती दूरवर पोहचविण्यासाठी त्यांनी अहोरात्र झटले ज्ञानेश्वरीचे वाचन त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत केले त्यांचे कार्य वारकरी संप्रदायासाठी मोलाचे ठरले असे त्यांनी यावेळी बोलतांना स्पष्ट केले.
ज्याने आपल्याला जग दाखविले असे आईवडील हे भूतलावरील मुख्य दैवते असून त्यांची सेवा कर्तव्य समजून मुलामुलींनी शेवटच्या श्वासा पर्यंत केली पाहिजे काळाच्या तावडीत जायचे नसेल तर जीवनात माळ घालून हरिभक्तीच्या माध्यमातून परमार्थ करावा असा संदेश ही त्यांनी यावेळी बोलतांना केला.
स्वर्गीय सदाशिवराव साळुंके यांच्या कार्याची महती सांगून उपस्थित भाविकांनी श्रद्धांजली वाहिली.यावेळी हभप राम महाराज खरवंडीकर,देवगड भक्त परिवाराचे भक्त अंबादास फोलाणे,संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे अध्यक्ष माधवराव दरंदले,विश्वस्त माजी आमदार पांडुरंग अभंग,गायणाचार्य ज्ञानेश्वर माऊली शिंदे,गोविंदराव शेटे,रामभाऊ जगताप,कैलास जाधव, कृष्णाभाऊ पिसोटे, कृष्णा महाराज हारदे,ज्ञानेश्वर राऊत,शांतीलाल महाराज मोरे,एकनाथराव भगत यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget