पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी |अमोल म्हस्के
उमेदवारांनी विधानसभा निवडणूकीसाठी केलेल्या खर्चात तफावत आढळल्याने शेवगाव विधानसभा मतदार संघात भाजपच्या उमेदवार आमदार मोनिका राजळे,राष्ट्रवादीचे उमेदवार अँड.प्रतापराव ढाकणे यांच्यासह वंचितचे उमेदवार किसन चव्हाण तसेच इतर चार उमेदवारांना नोटीसा पाठवण्यात आल्याची माहीती निवडणूक निर्णय अधिकारी देवदत्त केकाण यांनी दिली आहे.शेवगाव विधानसभा निवडणूकीतील उमेदवाराच्या प्रचाराच्या खर्चाच्या सर्व लेख्यांची तपासणी रविवारी(दि.१३) सनियंञण कक्षात झाली.निवडणूक आयोगाचे खर्च निरीक्षक तन्वीर आर.रहेमान यांनी त्याबाबत आढावा घेतला.या वेळी केकाण यांच्यासह सहाय्यक निवडणूक अधिकारी डाॕ.विनोद भामरे व नामदेव पाटील उपस्थित होते.सदर तपासणीत उमेदवारांनी निवडणूकीसाठी उघडलेल्या बॕक खात्यातून सर्व खर्च करणे आवश्यक असताना हातावर रक्कम ठेऊन खर्च करणे.बॕकेचे पासबुक अद्ययावत नसणे.व तपासणी कामी ते उपलब्ध न करणे.आदीसह आयोगाच्या निर्देशनानुसार अभिरुप निरीक्षण नोंदवहीनुसार होणारा खर्च व उमेदवारांनी दाखवलेला खर्च यात तफावत दिसून आली.भाजपच्या उमेदवार आ.मोनिका राजळे यांनी ७ लाख १९ हजार ४७४ रुपये खर्च सादर केला असून तो अभिरुप नोंदवहीनुसार ८ लाख ४० हजार ५३३ रुपये पाहीजे होता.त्याच्या खर्चात १ लाख २१ हजार ५९ रुपयांची तफावत आहे.राष्ट्रवादीचे उमेदवार अॕड. प्रतापराव ढाकणे ३ लाख २५ हजार खर्च सादर केला.या खर्चात १ लाख ४ हजार ४१३.९५ रुपयांची तफावत आहे.वंचितचे उमेदवार किसन चव्हाण यांनी ८८ हजार ६९१ रुपयांचा खर्च सादर केला.त्यात १३ हजार २५० रुपयांची तफावत आहे.तर अपक्ष उमेदवार धिरज बताडे हे तपासणीस गैरहजर होते.या सर्व पाच उमेदवारांना नोटीसा पाठवण्यात आल्या असून दोन दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.या अगोदर नोटीसा दिलेल्या चार उमेदवारांनी आपले खुलासे सादर केले आहेत.पूढील तपासणी (दि.१७ ) आॕक्टोबर रोजी होणार आहे.खर्च नियंत्रण कक्षात सहाय्यक खर्च नियंञक संजीव सानप,राज्य कर अधिकारी सचिन भगत,सहाय्यक लेखा अधिकारी राघवेंद्र चव्हाण,उपकोषागार एन.आर.पाठक,ए.आर.जगाताप काम पाहत आहे.

إرسال تعليق