जामखेड तालुक्यातील जवळा व अरणगावला पावसाने झोडपले

जामखेड | प्रतिनिधी 
जामखेड तालुक्यातील अरणगाव व जवळा या गावांमध्ये रविवारी दुपारी एकच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली.यंदा प्रथमच नान्नज व जवळा भागातून वाहणार्या नांदणी नदीला पुर आला. पुर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान जवळा गावातील अनेक गल्ल्यांनाही नदीचे स्वरूप आले होते.

मागीद गेल्या तीन चार दिवसांपुर्वी जामखेड तालुक्यातील अरणगाव, नान्नज , नायगाव या भागात यंदाच्या हंगामातील पहिला मोठा पाऊस पडला होता. यामुळे नान्नज - जवळा या भागातील काही बंधार्यांना पाणी आले होते. दरम्यान आज रविवारी पुन्हा अरणगाव, नान्नज जवळा या भागात पावसाने तासभर तुफान बॅटींग केली. दरम्यान रविवारी दुपारनंतर तालुक्यातील हळगाव, पिंपरखेड, आघी, चौंडी, फक्राबाद, बावी, खांडवी, झिक्री, धोंडपारगाव, कुसडगाव या भागात रिमझीम पाऊस पडत आहे. 

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget