राम शिंदेंचे कर्तृत्व पाहता ते अहिल्यादेवींचे कधीच वारस होऊ शकत नाही - छगन भूजबळ

जामखेड | प्रतिनिधी  
मंत्री राम शिंदे हे स्वता:ला ओबीसीचे नेते म्हणवून घेत असतील तर त्यांनी ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी विधानसभेत अथवा मंत्रीमंडळाच्या बैठकीत आवाज का उठवला नाही ? मग ते स्वता:ला ओबीसींचे नेते कसे म्हणवून घेतात ? असा सवाल करत युतीच्या सरकारने गेल्या पाच वर्षात ओबीसी महामंडळाला एक दमडाही दिला नाही. स्वता:ला ओबीसी नेता म्हणवून चालत नाही तर तुमचे कर्तृत्व किती यावरच तुमचे नेतेपण ठरत असते असा टोला राम शिंदे यांना लगावत जेव्हा मी ओबीसींचे प्रश्न मांडत होतो तेव्हा राम शिंदेंनी कधीच पाठबळ दिला नाही. राम शिंदेंचे कर्तृत्व पाहता ते अहिल्यादेवींचे कधीच वारस होऊ शकत नाही अशी तोफ महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी डागत सरकारच्या नाकर्तेपणावर चोहोबाजुंनी हल्लाबोल केला. 

राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ आघाडीच्या वतीने जामखेड तालुक्यातील नान्नज येथे सोमवारी जाहीरसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भुजबळ बोलत होते. यावेळी उमेदवार रोहित पवार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रदेशसरचिटणीस राजेंद्र कोठारी, प्रा मधुकर राळेभात, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजीराजे भोसले, सुर्यकांत मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ राऊत,अहिल्यादेवींचे मुळ वंशज अक्षय शिंदे, सुरेश भोसले,युवकचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे, भानुदास बोराटे, हरिभाऊ बेलेकर, अमोल गिरमे, त्रिंबक कुमटकर, आप्पासाहेब मोहळकर, ज्योती गोलेकर सह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना भुजबळ म्हणाले, गेल्या 25 वर्षांत भाजपच्या भूमिपुत्रांकडून कर्जत - जामखेडचा विकास झाला नसेल अन जेव्हा या भागातील सामान्य जनतेच्या मागणीवरून एखादा तगडा उमेदवार तुमच्या भागात येत असेल तर तो तुमच्या भागाचा चेहरामोहरा नक्कीच बदलवून दाखवेल असे सांगत तुम्ही रोहित पवारांना एकदा संधी देऊन तर पहा मग बघा तुम्हीच रोहित पवारांना आयुष्यभर सोडणार नाहीत असे सांगत जातीधर्माच्या राजकारणाला बळी न पडता आपल्या उज्वल भविष्यासाठी रोहित पवारांना साथ द्या असे अवाहन यावेळी भूजबळ यांनी केले. 

दरम्यान नान्नज व जवळा भागातील माळी समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी भुजबळांच्या उपस्थितीत   भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत जाहिर प्रवेश केला. भर दुपारी झालेल्या सभेस नागरिकांनी तुफान गर्दी केली होती.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget