मग अनाधिकृत विटभट्ट्या चालतात तरी कशा !

नेवासा तालूक्यात आसणाऱ्या शेकडो विटभट्टी चालकांची नोंदच तहसिल कार्यालयात नाही !

नेवासा,(प्रतिनिधी)
नेवासा तालूक्यात दोन वर्षापासून चालू आसलेल्या एकाही विटभट्टी चालकाने तहसिल कार्यालयात विट भट्टी चालविण्यासाठी परवानगी न घेता खुलेआम विट भट्ट्या सुरु केल्या आसून महसूल विभागानेही एकाही विटभट्टी चालकावर कारवाई केली नसल्याने महसूल विभागात "आंधळ दळतय अन् कुञ पिठ खातय" असा कारभार सुरु आसल्याने महसूल खात्याचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडविल्या प्रकरणी याला कोण जबाबदार असा खडा सवाल उपस्थित होतांना दिसून येत आहे.
  तालूक्यातील खेडे पाड्यात,महामार्ग,राज्यमार्गावर शेकडो विट भट्ट्या सुरु केल्या आहेत. दोन वर्षात महसूल विभागाकडून एकाही विटभट्टी चालकाने रितसर परवानगी न घेता भट्ट्या सुरु केल्या. माञ महसूल विभागाने एकाही विटभट्टी चालकावर कारवाई केली नसल्याचे माहीती अधिकारात विचारलेल्या माहीतीच्या आधारे ही बाब उघड झाली आहे.त्यामुळे महसूल खात्याचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडाला याला जबाबदार कोण असा सवाल निर्माण झाला आहे.नेवासा तहसिलदारांनी मोठ्या प्रमाणात सुरु आसलेल्या विटभट्टीवर कारवाई करण्याचे धाडस केले नाही मग या विटभट्टी चालकांना कोणाचा राजाश्रम मिळाला असा सवालही जनतेतून विचारला जात आहे.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget