कासार पिपंळगाव परीसरात उष्णतेच्या प्रमाणात वाढ,

ऑक्टोबर हीटची चाहुल

पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी | अमोल म्हस्के
आठवड्याभरापासून उष्णतेच्या प्रमाणात वाढ झाली आहे.काही प्रमाणात पाऊसही थांबला आहे.तरी हवामान खात्याकडून परतीच्या पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.वातावरणात दररोज बदल होताना दिसत असून गेल्या दोन दिवसापासून अचानकपणे उष्णतेचे प्रमाणात वाढ होते.तसेच काही वेळा कमी होताना दिसत आहे.तापमानातील चढउतारामुळे आरोग्यावर त्याच्या परीणाम जाणवत आहे.
या वर्षी मध्यम प्रकारचा पाऊस कासार पिपंळगाव परीसरात झाला.दरवर्षी सप्टेंबर अखेरीस वातावरणातील तापमानात बदल होताना दिसत असतो.पाऊसाचे प्रमाण कमी झाल्याने वातावरणात बदल होवून उष्मा जाणवू लागला आहे.
सद्धा परतीचा पाऊस पडेल अशी आशा असतानाच ऑक्टोबर महीन्यातील वाढत्या उन्हाचा तडाखा जाणवत असल्याने तापमानात सातत्याने वाढ होत आहे.त्यामुळे सामान्य नागरीकांना उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत.या काळात विधान सभा मतदान असल्याने वेगवेगळ्या पक्षाच्या कार्येकर्ताना उन्हात आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करावा लागत आहे.तसेच काही नेते मंडळीच्या सभा उन्हात होत असल्याने कार्येकर्तै उन्हाला वैतागून गेले आहेत.तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा सुरु आहेत.परीक्षेचे पेपर असल्याने दुपारी एकच्या सुमारास शाळा,महाविद्यालये सुटतात.त्यावेळी शालेय विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत.तसेच शेतातील बाजरी,भुईमूग पीकाची काढणी चालू आहे.त्यामुळे शेतात काम करणाऱ्या व्यक्तीना उन्हामुळे उष्णतेत वाढ झाल्याने मानसिक ञास सहन करत उन्हात काम करावे लागत आहे.या वाढत्या उष्णतेचा परीणाम पशु,पक्ष्यांवर होताना दिसत आहे.उन्हापासून बचाव करण्यासाठी वृक्षाच्या दाट सावलीचा आधार घेत आहेत.ज्या प्राण्यांना उष्णतेचा ञास होता.त्यांना तातडीने वैद्यकीय उपचार न मिळाल्यास त्याच्या जीवाला धोका निर्माण होवू शकतो.आकाशात उडणा-या पक्षांना उष्ण वा-याचा ञास सहन करावा लागत आहे.तसेच उन्हात माळरानावर चरणा-या गायी,म्हशी,बैल,शेळ्यांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget