नेवासाफाटा येथे वेलनेस फिटनेस सेंटरचा शुभारंभ

बॉडी चेकअप शिबिरात दीडशे जणांची मोफत तपासणी, 
आहार व व्यायामाच्या माध्यमातून आयुष्याला सुंदर बनवा - डॉ.तुकाराम नेहरकर 


नेवासा(प्रतिनिधी)
नेवासाफाटा येथील भूमिलेख कार्यालयासमोर माऊली वेलनेस अँड फिटनेस सेंटर चे उदघाटन जागतिक आरोग्य सेंटर या दालनाचा शुभारंभ करण्यात आला.आहार व व्यायामाच्या माध्यमातून आयुष्याला सुंदर बनवा असे आवाहन जागतिक आरोग्य सल्लागार पाथर्डी येथील डॉ.तुकाराम नेहरकर यांनी यावेळी बोलतांना केले.
    यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी जागतिक आरोग्य सल्लागार पाथर्डी येथील डॉ.तुकाराम नेहरकर हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते तर जागतिक आरोग्य सल्लागार अर्जुन सुसे,रविंद्र वेताळ,आदर्श गाव सुरेशनगर चे मार्गदर्शक युवा नेते सुरेश उभेदळ,सामाजिक कार्यकर्ते गोपाल गायकवाड,श्रीराम राठोड,सौ.दीपालीताई पुणेकर, जयकिसन ढाकणे,सुरेश उभेदळ,होमगार्ड समादेशक बाळासाहेब देवखिळे,साईनाथ वडते प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते.
    यावेळी वेलनेस फिटनेस सेंटरच्या चालक सौ.योगिता वडते व चालक श्रीमती तमन्नाबी शेख यांनी स्वागत करून वेलनेस फिटनेस सेंटर सुरू करण्यामागची भूमिका विषद केली.आहारातून आरोग्याकडे प्रत्येकाला नेण्यासाठी फिटनेस सेंटर सुरू करण्यात आले असून महिलासाठी पहाटे ५ ते ६ तर पुरुषांसाठी ६ ते ७ अशी वेळ ठेवण्यात आली असून दीर्घायुषी जीवनासाठी या फिटनेस सेंटरचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
     यावेळी बोलताना जागतिक आरोग्य सल्लागार अर्जुन सुसे म्हणाले की शरीर सुदृढ असेल तरच आपले आरोग्य चांगले राहू शकते त्यासाठी जीवनात योग्य आहारा बरोबरच व्यायाम आवश्यक असल्याचे सांगीतले.
     जागतिक आरोग्य सल्लागार डॉ.तुकाराम नेहरकर म्हणाले की एखादयाला व्याधीतून मुक्त करणे हे देखील पुण्याचे कार्य असून फिटनेस सेंटरसारखी दालने ही माणसांच्या आरोग्याची काळजी घेते त्याच्या सारखे समाजसेवा दुसरी कोणतीही नाही असे सांगून त्यांनी
आहारातून आरोग्याकडे,पोषक आहाराविषयी मार्गदर्शन केले.
       यावेळी आरोग्य सल्लागार रविंद्र वेताळ,हभप सौ.दीपालीताई पुणेकर,सुरेश उभेदळ यांनी फिटनेस  सेंटरला शुभेच्छा दिल्या.यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर श्रीमती मन्नाबी शेख यांनी आभार मानले

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget