मुळाकाठचा विकास केल्याचा आंनद :- आ.मुरकुटे

करजगांव 
मुळाकाठ परिसरातील सर्व रस्ते,मुळा नदीवरील बंधारा दुरूस्ती व ते पाण्याने भरूण चा प्रश्न तसेच वीज,पाणी,
व्यायामशाळा तसेच सोनई-करजगांव पाणी योजना  मार्गी लावल्यामुळे मुळाकाठ परिसराला न्याय दिल्यामुळे मतदाराच्या रूणातुन मुक्त होत असल्याचा आंनद होत असल्याचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी सांगितले.
तालुक्याच्या संपुर्ण विकासासाठी पुन्हा एकदा विजयी करण्याचे आव्हाहन यावेळी  आ. मुरकुटे यांनी केले. ते पानेगांव येथे प्रचार सभेत बोलत होते.अध्यक्ष पदी दशरथ जंगले होते. गेल्या तीन-चाळीस वर्षाचा विकासाचा अनुशेष भरूण काढण्याचे काम आ.मुरकुटे यांनी  केल्याचे  जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे यांनी सांगितले. तालुक्यामध्ये रस्त्याची समस्या गंभिर होती.आ.मुरकुटे यांनी तालुक्यात रस्त्यांचे जाळे निर्माण करूण दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध करूण दिल्याचे  लंघे म्हणाले. 
यावेळी मुळाथडी पाणी आरक्षण कृतीसमीतीचे अध्यक्ष दत्तात्रय घोलप,विजय जंगले,शिवप्रहार चे किशोर जंगले,प्रकाश शेटे,राजेंद्र मते,रशिदभाई इनामदार,आदीनी मनोगत व्यक्त केले. 
प्रास्तविक युवा कार्यकर्ते विजय जंगले यांनी केले तर आभार पाराजी गुडधे यांनी मानले.


पानेगांव येथिल सभेत आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या सभेत माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल लंघे यांचे आगमण होताच कार्यकर्त्यानी  "जय हरी विठ्ठला"च्या घोषणां दिल्या.या घोषणांनी पानेगाव दुमदुमले.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget