कु.विद्या मंडलिक हिची कृषी अधिकारी पदी राज्यात द्वितीय क्रमाकांनी निवड

नेवासा(प्रतिनिधी)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन  २०१८ मध्ये कृषी अधिकारी या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत नेवासाफाटा येथील गाडेनगर परिसरात रहाणाऱ्या कु.विद्या शबाजी मंडलिक हिची तालुका कृषी अधिकारी या पदासाठी राज्यात व्दितीय क्रमांकाने निवड झाली आहे.
  सन २०१८ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत कृषी अधिकारी या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.यामध्ये नेवासा येथील कु.विद्या शबाजी मंडलिक अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात द्वितीय क्रमांकाने तालुका कृषी अधिकारी म्हणून निवड झाली.कु.विद्या मंडलिक हिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथरे बुद्रुक तालुका राहाता तर माध्यमिक शिक्षण प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय पाथरे बुद्रुक येथे झाले आहे.तसेच एम.एस्सी अँग्री पदव्युत्तर पदवीचे शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे झाले आहे.कु.विद्या ही नेवासाफाटा येथील गाडेनगर प्रभागात रहाणारे व प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे माजी मुख्याध्यापक शबाजी मंडलिक यांची कन्या आहे तिच्या या यशाबद्दल अनेकांनी तिचे अभिनंदन केले आहे.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget