धामणगाव येथील जगंदबा देवी मंदिरात आठव्या माळीला दर्शनासाठी भाविकांची गर्दी

पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी । अमोल म्हस्के
पाथर्डी तालुक्यातील धामणगाव येथील जगंदबा देवी मंदिरात भाविक भक्तानी आठव्या माळी निम्मित मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली होती.दरवर्षी प्रमाणे या ठिकाणी नवराञ उत्सव निम्मित किर्तन,भजन,भारुड,गोंधळ,देवीचे गाणी कार्यक्रमाचे आयोजन जगंदबा देवी देवस्थान समितीने केले आहे.धामणगाव या ठिकाणी पाण्याचे तीन कुंड आहेत.त्यामध्ये स्नान केल्यास संसार प्रपंचता ञासून विविध तापाने तृप्त झालेल्या जिवाला शारीरिक व मानसिक रोगातून मुक्तता मिळते असे जुने जानकार ज्येष्ठ मंडळीचे मत आहे.पाथर्डी तालुक्यातील जगंदबा देवी हे प्रसिद्ध देवस्थान आहे.यावेळी नवराञ उत्सव निम्मित देवीचा होम,पुजा तसेच याञेत लहान मुलांच्या विविध खेळण्यामुळे दुकाने गच्च भरलेली आहेत.जगंदबा देवीचा परीसर चैतन्यमय झालेला आहे.परंतु शनिवारी झालेल्या जोरदार पाऊसामुळे रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे.तसेच पाथर्डी ते धामणगाव रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पड्ल्याने येणाऱ्या भाविक भक्ताना वाहन चालवताना मानसिक ञास सहन करावा लागत आहे.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget