आता टोप्या घालणं बंद करा...

जनता जनार्धनाचा कौल महायुतीच्या मागे आहे ! राष्ट्रवादीला महाराष्ट्रातून हद्दपार करणार - ग्रामविकासमंञी पंकजा मुंढे


नेवासा,(प्रतिनिधी)
कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी टोप्या घालण्याचेच उद्योग केले.आता टोप्या घालन बंद करा गरीब माणूस देशाचा पंतप्रधान झाल्यावर कसा बदल घडतो हे नरेंद्र मोदींनी दाखवून दिले.आता विधानसभा निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र होणार आसून महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन राज्याच्या ग्रामविकासमंञी ना पंकजा मुंढे यांनी पांढरीपुल येथील जाहीर सभेत बोलतांना केले.
     राहूरी,पार्थर्डी व नेवासा विधानसभेच्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी दुपारी दोन वाजता ना मुंढे यांची जाहीर सभा झाली यावेळी त्या बोलत होत्या.
   व्यासपिठावर खासदार डॉ सुजय विखे,राहूरी मतदार संघाचे उमेदवार शिवाजी कर्डिले,शेवगांव - पार्थर्डी मतदार संघाच्या मोनिका राजळे व नेवासा मतदार संघाचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे,महापौर बाळासाहेब वाकळे,चाचा तनपूरे,अशोक गायकवाड,अभय आव्हाड, सुधाकर पालवे,पुरुषोत्तम खेडकर,भाऊसाहेब पटारे, रशिद इनामदार आदी उपस्थित होते.
  या जाहीर सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व जिल्हा परीषदचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांचा भाजपामध्ये ना मुंढेच्या प्रमुख उपस्थित प्रवेश झाला यावेळी बोलतांना ना मुंढे म्हणाल्या की,लोकनेते गोपिनाथ मुंढे नंतर माझ्याच उपस्थित लंघेंचा भाजपामध्ये प्रवेश झाला हा योगायोग आसून जयहरी निवडून येणार ही आता काळ्या दगडावरची पांढरी रेघ आसल्याचे सांगितले.जनता जनार्धनाचा कौल महायुतीच्या उमेदवारांमागे आसल्याने विरोधी उमेदवार सध्या दिसतच नसल्याचे सांगून त्या म्हणाल्या की,लोकसभा निवडणूकीत एक एक खासदार निवडून देवून पुन्हा नरेंद्र मोदींना पंतप्रधान केले आता एक एक आमदार निवडून देवून देवेंद्र फडणविस यांना दुसऱ्यांदा मुख्यमंञी करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन करत तुमचे पाणी मी बिडला पळवणार अशा वावड्या विरोधी लोक उठवत आहेत मी मुंढेची लेक आहे मी महाराष्ट्राच्या जनतेला पाणी पाजते तुमचे पाणी पळविण्याचा प्रश्नच नसून विरोधकांना मुद्दे नसल्यामुळ टपोरीगिरीचे हे उद्योग आसल्याचे त्यांनी सांगितले.
  यावेळी खासदार सुजय विखे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे,शिवाजी कर्डिले,अशोक गायकवाड,रशिद इनामदार यांची भाषणे झाली.यावेळी मोठ्या संख्येने जनसमूदाय उपस्थित होता.


ना पंकजा मुंढे यांचे भाषण चालू आसतांना विज गायब झाली त्यामुळे माईक बंद पडला दोन मिनीट जनरेटर चालू होण्याची वाट पहात ना मुंढे उभ्याच होत्या पण जनरेटर चालू न झाल्यामुळे जनतेला हात उंचावून अभिवादन करत त्या बाहेर निघाल्यावर जनरेटर चालू झाले

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget