ऐन निवडणूकीच्या तोंडावर राम शिंदेंना जोरदार धक्का

भाजपचा बडा नेता लागला रोहित पवारांच्या गळाला

जामखेड | प्रतिनिधी 
राज्याचे पणन व वस्त्रोद्योगमंत्री  तथा अहमदनगरचे पालकमंत्री प्रा राम शिंदे यांच्या विरोधात शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी रिंगणात उतरण्याची जोरदार तयारी करत राम शिंदेंसमोर कडवे अव्हान उभे केले आहे यामुळे कर्जत - जामखेडच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 

पवार व शिंदे गटाकडून मतदारसंघात जोरदार वातावरण निर्मिती केली जात आहे. त्याबरोबर फोडाफोडीच्या राजकारणालाही वेग आला आहे.  कर्जत तालुक्यातील मिरजगाव जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य तथा लोकप्रिय युवा नेते परमवीर पांडूळे यांनी राम शिंदेंची साथ सोडत राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांना  पत्रकार परिषद घेऊन जाहिर पाठिंबा देत राष्ट्रवादीत आपल्या शेकडो समर्थकांसह प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जामखेड तालुक्यातील झिक्री येथे मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही पत्रकार परिषद संपन्न झाली. 

रोहित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत याआधीच मागील आठवड्यात भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे तसेच जामखेड पंचायत समितीच्या उपसभापती राजश्री मोरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आता माजी जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडूळे यांनी राष्ट्रवादीशी घरोबा केल्याने भाजपाच्या गोटात मोठा गदारोळ उडाला आहे. रोहित पवारांच्या सर्जिकल स्ट्राईकवर मंत्री राम शिंदे कोणता मास्टर स्ट्रोक खेळणार याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget