कासार पिपंळगाव येथील तुळजाभवानी देवी मंदिरात घटस्थापना

पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी । अमोल म्हस्के
कासार पिपंळगाव येथे प्राचीन  तुळजाभवानी देवी मातेचे मंदिरात घटस्थापना करण्यात आली.हे तुळजाभवानी मातेचे मंदिर परीसरात प्रसिद्ध असून महिलांच्या नवसपूर्तीसाठी मानले जाते.या ठिकाणी दररोज विधीवत पुजा केली जाते.तसेच नवराञी उत्सव निम्मित गाणी,भजन,पुजा पाठ,महा प्रसादाचे आयोजन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत.परीसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने देवीच्या  दर्शनासाठी येत आहेत.कार्यक्रमाचे नियोजन शेषनारायण म्हस्के,बाळासाहेब म्हस्के तसेच परीसरातील ग्रामस्थ करत आहेत.मंदिर परीसरातील वातावरण प्रसन्न आहे. हे मंदिर अतिशय जुन्या काळातील प्राचीन मंदिर आहे.मंदिरातील देवीचे पहीले पुजारी तुकाराम गोविंद म्हस्के होते.सुमारे ५० ते ६० वर्षापूर्वीचे मंदिर असून देवीची पुजा,आरती दैनंदिन कार्यक्रम सुरु आहे.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget