वसंत इथापे यांचा सेवापुर्ती सोहळा.

विसापूर
विसापूर ता.श्रीगोंदा येथील रयत शिक्षण संस्थेच्या सरस्वती विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे उप शिक्षक प्रा.वसंतराव जयसिंग इथापे सेवानिवृत्त झाल्याने त्यांना रयत सेवक व ग्रामस्थांकडून त्यांचा सपत्नीक सेवापुर्ती सत्कार करण्यात आला. 
  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा सल्लागार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब जठार होते.इथापे यांनी सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयात गणित विषयाचे सोळा वर्षे अध्यापनाचे काम केले.त्यामुळे इथापे विद्यार्थांचे चाहते बनले होते.या वेळी विद्यार्थ्यांसह रयत शिक्षण संस्थेचे अजिव सदस्य बाजीराव कोरडे,प्रमुख वक्ते गणपतराव शेळके,प्राचार्य सुभाष रणसिंग,रयत सेवक बँकेचे माजी संचालक सुरेश जठार,वृक्षमित्र प्रा.आसिफ सिद्दीकी,राजेंद्र खेडकर यांनी इथापे यांचा गौरव केला.यावेळी शाळा समितीचे सदस्य तुकाराम जठार,छगन शिंदे,पत्रकार नानासाहेब जठार,विठ्ठल वाळके,एरंडोली व विसापूर येथील ग्रामस्थ व इथापे यांचे नातेवाईक उपस्थित होते.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget