शेवगाव पाथर्डी मतदार संघातून भाजपकडून मोनिका राजळे उमेदवार

पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी । अमोल म्हस्के
 पाथर्डी शेवगाव मतदार संघातून भारतीय जनता पार्टीने पुन्हा आ.मोनिका राजळे यांना उमेदवारी दिली आहे.तसेच बंडखोर उमेदवारांना धक्का दिला आहे.भाजपने जाहीर केलेल्या  पहील्या यादीत मोनिका राजळे यांचे नाव आहे.गतवेळी मोनिका राजळे शेवगाव पाथर्डी मतदार संघातून चांगल्या मताधिक्यांनी निवडून आल्या होत्या.तसेच गेल्या पाच वर्षात शेवगाव पाथर्डी मतदार संघात केलेल्या विकासकामामुळेचा त्याचे नाव पहील्या यादीत आले असल्याचे पक्षातील अधिकृत सुञाकडून समजते.पाथर्डी शेवगाव मतदार संघातून अनेक भाजप नेत्यांनी पक्षाकडे मुलाखती दिल्या होत्या.परंतु पक्षाने मोनिका राजळे यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवत मतदार संघात भाजप व मिञपक्ष शिवसेना महायुतीकडून उमेदवारी निश्चित केली आहे.भाजपच्या पहील्याच यादीत नाव जाहीर केल्याने  मतदार संघातील उमेदवारीच्या चर्चा संपुष्टात आली आहे.आता मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळेल या चर्चा सुरु झाल्या आहेत.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget