इंदिरा कॉंग्रेसचे तालूका उपाध्यक्ष क्षिरसागर यांचा भाजपात प्रवेश !

नेवासा,(प्रतिनिधी) 
नेवासा तालूका इंदिरा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष संदिपबाबा क्षिरसागर यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्यात आला.भाजपाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या मेळाव्यात हा प्रवेश करण्यात आला.राज्याचे गृहनिर्माण मंञी ना राधाकृष्ण विखे पाटील यांचे क्षिरसागर हे कट्टर समर्थक आहेत.भेंडा जिल्हा परीषद गटाचे सदस्य दत्तूभाऊ काळे यांच्या विशेष पुढाकारातून क्षिरसागर यांचा प्रवेश करण्यात आला.ते इंदिरा कॉंग्रेसचे तालूका उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते त्यांना भाजपातही संघटनात्मक पद देण्यात येणार आसल्याचे यावेळी सांगण्यात आले.क्षिरसागर यांचे संघटन कौशल्य व वकृत्वशैलीमुळे या विधानसभा निवडणूकीच्यावेळी भाजपाला एक चांगला मोहरा गळाला लागला आसून त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे त्यांचे आमदार बाळासाहेब मुरकुटे,तालूकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे जि.प सदस्य दत्तूभाऊ काळे,माजी सभापती भाऊसाहेब पटारे,सुप्निल साखरे,माजी सरपंच देविदास साळूंखे,जनार्धन जाधव,अशिष वंजारे,परेलाल मुनोत,पोपट शेकडे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget