रेकॉर्डब्रेक शक्तीप्रदर्शन करत राम शिंदेंनी केला उमेदवारी अर्ज दाखल

जामखेड | प्रतिनिधी 
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून राज्याचे पणन व वस्त्रोद्योग मंत्री राम शिंदे यांनी ऐतिहासिक शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मंत्री गिरीश महाजन, आमदार मोनिकाताई राजळे उपस्थित होत्या. 

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कर्जत शहरातील अक्काबाई चौक ते वालवड रस्त्यावरील सभास्थान या दोन किलोमीटर अंतराची ऐतिहासिक रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत हजारो नागरिक सहभागो झाले होते. संपुर्ण कर्जत शहर गर्दीने फुलून गेले होते. ऐतिहासिक रॅलीनंतर सायंकाळी विराट सभा पार पडली. सकाळी 9 वाजेपासून मतदारसंघातील गावागावातील कार्यकर्ते कर्जत शहरात दाखल झाले होते. तब्बल आठ तासांच्या प्रतिक्षेनंतर जाहिर सभा सुरू झाली. दरम्यान गिरीश महाजन हे पुढील कार्यक्रमांसाठी रॅली अर्ध्यावर सोडून निघून गेले. रॅलीत उपस्थित जनसमुदायाकडून राम शिंदे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है... आता आमचं पक्क ठरलयं राम शिंदे पुन्हा... अश्या घोषणांनी शहर दणाणूण गेलं होतं. 

दरम्यान सकाळी कर्जत शहर व परिसरात पाऊस झाल्यामुळे काही काळ नियोजन कोलमडले होते. परंतू पावसाने उघडीप दिल्यानंतर नियोजन पुर्ववत होऊन उशिराने सभा पार पडली.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget