सावित्रीबाई कला महाविद्यालयात विविध कार्यक्रम संपन्न

स्वच्छता ही सेवा,जलस्त्रोत परिसर स्वच्छता व प्लॅस्टीक मुक्ती उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम संपन्न. 

विसापूर
मंगळवार दि.1 व 2 ऑक्टोबर रोजी पिंपळगाव पिसा ता.श्रीगोंदा येथील कुकडी एज्युकेशन सोसायटीच्या सावित्रीबाई कला महाविद्यालयात मंगळवार दि.1 व 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने  महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती व राष्ट्रीय सेवा योजना सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता ही सेवा या उपक्रमात विविध कार्यक्रमांनी संपन्न झाले.
मंगळवारी विद्यार्थ्यांकडून पिंपळगाव पिसा येथे जाऊन स्वच्छाता फेरीचे आयोजन करण्यात आले.महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गावात जाऊन प्लॅस्टीक वापर बंदीसंदर्भात घरोघरी जाऊन नागरिकांचे प्रबोधन केले.सर्व गावातील प्लॅस्टीक जमा करुन ते नष्ट करण्यात आले.तसेच गावातील जलस्त्रोत परिसरात जाऊन तेथिल स्वच्छता करण्यात आली. यामध्ये महाविद्यालयातील   सर्व विद्यार्थी व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
दि.२ रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी प्रथम सर्व महाविद्यालयाच्या संपूर्ण परिसराची स्वच्छाता करण्यात आली नंतर महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. शांतिलाल घेगडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.इतिहास विभागाचे प्रमुख प्रा.नवनाथ वाजगे यांनी गांधीजींच्या संपूर्ण कार्याचा परिचय करुन दिला.याप्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी गांधीजीच्या जीवनावर भाषणे केली यामध्ये कु.कोमल भालके, रोहित कांबळे,अमोल टकले , दिपक मगर,किरण घाडगे व त्यांचे सहकारी यांनी सहभाग घेतला.
 सर्व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रंजित चव्हाण याने केले तर आभार प्रविण तोंडे याने मानले.सदर उपक्रमांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.के ढगे व कुकडी एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख आमदार राहुल जगताप यांनी कौतूक केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी यांचा प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाचे नियोजन कार्यक्रम अधिकारी प्रा.नामदेव शितोळे व विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ. देविदास शेटे यांनी केले.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget