संगमनेर शिवसेनेचे उमेदवारी साहेबराव नवले यांना जाहीर

निष्ठावंताना डावलल्याने नाराजी 

संगमनेर (प्रतिनिधी)
निवडणूकीचा अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस बाकी राहिल्याने उमेदवारांची घोषणा केली जात आहे संगमनेर विधानसभेसाठी शिवसेनेने साहेबराव नवले यांना जाहीर करण्यात आली आहे, 
   गेली अनेक दिवसांपासून कुणाला उमेदवारी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते, प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांचे विरोधात उमेदवाराचा शोध घेतला जात होता, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या कामी महत्त्वाची भूमिका बजावली असली तरी यश आले नाही, उमेदवाराच सापडत नसल्याने अखेर अचानक आलेले साहेबराव नवले यांना देण्यात आली, ही वार्ता येताच अनेकानी जाहीर पणे नाराजी व्यक्त केली, निष्ठावंताना डावलून कधीही पक्षासाठी काम न करता आयत्या वेळेला पक्षाने अशी उमेदवार दिली, यामुळे आ. थोराताचा विजयाचा मार्ग सोपा झाला आहे, निवडणूक एकतर्फी होणार असून लिड किती वाढते हीच उत्सुकता बाकी राहीली आहे, शिवसेने कडून आप्पा केसकर, बाबासाहेब कुटे, शरद थोरात, अभियंता राजेंद्र राहणे, शालिनीताई विखे, जनार्दन आहेर , संजय फड यांच्या नावाची जोरदार चर्चा होती, मात्र शिवसेनेचे कार्यपद्धती  आयारामाची आहे ,असा आजवरचा अनुभव आहे, राज्यात युतीचे सरकार असल्याने  चांगला उमेदवार द्यावा यासाठी अनेकांनी प्रामाणिक प्रयत्न केले, पण यश आले नाही, नियोजना अभावी सेनेचे फार मोठे नुकसान झाले आहे, उमेदवार  देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे, स्थानिक पदाधिकारी , शिवसैनिक या बरोबरच भाजपचे पदाधिकारीही तिव्र नाराज झाले आहे, साहेबराव नवले यांच्या स्वभावापासून ते बोलण्याची पध्दत वागणूक या सर्वांना जवळून पाहीले आहे, ज्यांनी गेली पाच वर्षे एक शाखा उघडली नाही , पक्षबांधणी केली नाही, 
त्याना उमेदवारी मिळालीच कशी असा प्रश्न तालुक्यात विचारला जात आहे, आता कोण प्रचार करणार अशी चर्चा सुरू झाली आहे, आ. थोरात पुन्हा एकदा लकी ठरले आहे, ही लढाई न राहता केवळ औपचारिकता बाकी आहे.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget