शरणपूर वृद्धाश्रमात जागतिक जेष्ठ नागरिक दिन साजरा

समाज विकास समितीच्या वतीने वस्त्र अल्पोपहार देऊन वृद्धांचा गौरव

नेवासा(प्रतिनिधी)
जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून नेवासाफाटा येथील शरणपूर वृद्धाश्रमातील वृध्दाना समाज विकास समितीच्या वतीने सिस्टर बिंदू यांच्या पुढाकाराने वस्त्र फळे अल्पोपहार देण्यात आला 
        शरणपुर वृध्दाश्रमात समाज विकास संस्थेच्या व्यवस्थापिका सिस्टर बिंदू यांनी भेट देवून आश्रमातील वृध्दाना फळ,बिस्किटे व टॉवेल वाटप करून वृध्दाशी हितगुज साधले व आश्रमातील वृध्दाना कायम सहकार्य करणार असल्याची ग्वाही यावेळी बोलताना दिली.
          स्वतःच्या आर्थिक गरजा पूर्ण झाल्यानंतर आर्थिक हातभार अशा संस्थांना देण्याची दानत सर्वांमध्ये येण्याची  काळाची गरज आहे.आपणही गरजवंतांना मदत करून मायेची सावली देवू शकतो अशा भावना या प्रसंगी सिस्टर बिंदू यांनी बोलतांना व्यक्त केल्या.
          यावेळी सेंट मेरी इंग्लिश स्कूलच्या निरीक्षक सिस्टर अॅनी,समाज़विकास समितीचे अशोक गायकवाड यांच्यासह  आश्रमातील वृध्द उपस्थित होते.शरणपूर वृद्धाश्रमाचे अध्यक्ष रावसाहेब मगर यांनी प्रारंभी प्रास्ताविक करून प्रमुख मान्यवरांचे स्वागत केले.सचिव सौ.सुरेखाताई मगर यांनी संस्थेच्या दैनंदिन सेवेविषयी माहिती दिली.संस्थेचे काळजीवाहक प्रतिक्षा शिरसाठ यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget