पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी । अमोल म्हस्के
अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाचे वेध लागले आहेत.दस-यानंतर दिवाळी सणाच्या तयारीसाठी वेध लागले आहेत.विशेषतः महीला वर्ग दिवाळीच्या तयारीसाठी सरसावला आहे.
ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात दिवाळीचा प्रारंभ होत आहे.२५ ऑक्टोबरला धनञयोदशी,वसुबारस तर २७ ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन आहे.२८ ऑक्टोबरला दिवाळी पाडवा आणि २९ ऑक्टोबरला भाऊबीज सण आहे.त्या पाश्वभूमीवर महीला वर्गाने दिवाळी सणाच्या तयारीला प्रारंभ केला आहे.घरातील केरकचरा काढण्यापासून व घराला
रंग-रगोंटी,सजावट,अंधरुन पाघंरुण धुण्याकडे महीलांचा कल आहे.घरामध्ये नविन फर्निचर बनविण्याकडेही नागरीकांचा ओढा वाढल्याचे चिञ आहे.मागील काही वर्षापासून रेडीमेड फराळाला गृहिणीची मागणी वाढली आहे.यंदाही रेडीमेड फराळावर ताव मारणा-यासाठी गृहउद्योग फराळाच्या तयारीला वेग आला आहे.दुसरीकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या दुकानदारासह किरकोळ विक्रेत्यांनी सवलतीची खैरात तसेच जुन्या वस्तू घेणे त्यावर नविन वस्तू खरेदीवर सवलत देणे.अशा वेगवेगळ्या ऑफरच्या जाहीरात फलकही नागरीकांचे लक्ष वेधून घेत आहेत.एकूणच दिवाळी सणाची लगबग सुरू झाली आहे.

Post a Comment