विसापूर
प.पु.आनंदाश्रम स्वामींनी आयुष्यभर वैराग्याचे जीवन जगून भक्तांना आध्यात्मिक मार्ग दाखवला असल्याचे हभप पांडुरंग महाराज क्षिरसागर यांनी सुरेगाव ता.श्रीगोंदा येथे किर्तन सेवेत सांगितले.
सुरेगाव येथील आनंदाश्रम स्वामींचे मठात चातुर्मास व कोजागरी पौर्णिमेचे औचित्य साधून हभप क्षिरसागर महाराज यांच्या किर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी स्वामींचे शिष्य हभप पाटील काका उपस्थित होते.क्षिरसागर महाराज पुढे म्हणाले की,आनंदाश्रम स्वामींनी कधीही प्रसिद्ध व संपत्ती यांना महत्त्व दिले नाही.परमेश्वराची निस्वार्थ सेवा केली तर तो निश्चित वेगवेगळ्या रूपात भेटतो अशी त्यांची धारणा होती.ज्ञानेश्वर महाराजांनी पंढरपूरच्या पांडुरंगरंगाची सेवा केली त्यांना देवपण प्राप्त झाले.आनंदाश्रम स्वामींनी आळंदीत राहुन ज्ञानेश्वर महाराजांची सेवा केली त्यांनाही देवपण प्राप्त झाले.त्यामुळे ईश्वराची भक्ती हाच देवपण प्राप्त होण्याचा सुलभ मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले.कोजागीरी पौर्णिमेचे महत्त्व सांगताना त्यांनी सांगितले की,या दिवशीच श्रीकृष्णाने त्यांच्या अनेक लिला दाखवल्या होत्या.आनंदाश्रम स्वामींचे मठात गुरुपौर्णिमेपासुन चातुर्मास समारंभास अखंडपणे चालू आहे.या काळात दरदिवशी वेगवेगळ्या गावातील स्वामी भक्तांकडून किर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे.क्षिरसागर महाराज यांच्या किर्तन सेवेचे व महाप्रसादाचे आयोजन उखलगाव येथील हभप नामदेव महाराज वाळके व सुरेगाव येथील संतोष संपत रोडे यांनी केले होते.सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थानचे अध्यक्ष मनमोहनसिंग कोचर,कर्मयोगी कुंडलीकराव जगताप कुकडी साखर कारखान्याचे संचालक अंकुश रोडे,संस्थानचे सचिव हभप दिलीप कुलकर्णी,सरपंच सर्जेराव रोडे,संस्थानचे व्यवस्थापक संतोष शिंदे,छगन शिंदे प्रयत्न करत आहेत.

Post a Comment