नेवासा,(प्रतिनिधी)
संतांनी दिलेल्या ज्ञानामुळेच मनुष्याला परमार्थाची प्राप्ती होते ज्ञानेश्वर माऊली यांनी समतेचा अंगीकार केला सर्वजाती धर्माच्या लोकांना समतेच्या व्यासपीठावर नेण्याचे कार्य माउलींनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून केले असे प्रतिपादन आळंदी येथील हरिभक्त परायण रविदास महाराज शास्त्री यांनी कीर्तन महोत्सवातील पहिले पुष्प गुंफतांना केले.
नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणात स्वानंद सुखनिवाशी सदगुरू जोग महाराज यांच्या निर्याण शताब्दी व वैकुंठवाशी गुरुवर्य बन्सी महाराज तांबे यांच्या २५ व्या पुण्यतिथी महोत्सवात आयोजित कीर्तन मालेतील पहिले पुष्प गुंफतांना ते बोलत होते.
यावेळी बोलतांना हभप शास्त्री महाराज पुढे म्हणाले की संत वाड्मय नवीन पिढीला कळले पाहिजे त्यासाठी त्यांना एकत्रित करा संत वाड्मयाने त्यांच्या जीवनातन नक्कीच यश प्राप्ती होईल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला.संतांची कृपा सहज होते ते कृपाळू स्वभावाचे असतात त्यांच्या संगतीत गेल्यानंतर ही कृपादृष्टी होते ती कृपादृष्टी संत्संगाच्या माध्यमातून जीवनात प्राप्त करा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले.पुरुष असून संत ज्ञानेश्वर महाराज हे माऊली आहे त्यांचे हदय मातृ हदय आहे नेवासा हे माऊलींची कर्मभूमी असल्याने हे पावन क्षेत्र आहे बन्सी महाराज तांबे यांनी स्व:तची मालमत्ता विकून त्यावेळी पैस मंदिराची निर्मिती केली त्यांचे कार्य वारकरी संप्रदायासाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोदगार त्यांनी काढले.
यावेळी गुरुवर्य भास्करगिरी महाराज,शिवाजी महाराज देशमुख,नंदकिशोर महाराज खरात,सचिन महाराज पवार,
लक्ष्मण महाराज नांगरे, विजय महाराज पवार,संस्थानचे अध्यक्ष माधवराव दरंदले,डॉ.अशोक शिंदे,मनसुख महाराज दहे,कृष्णा महाराज हारदे,राम महाराज बोचरे
यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment