संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे माजी विश्वस्त व जुन्या पिढीतील व्यापारी सदाशिवराव साळुंके यांचे निधन

नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे माजी विश्वस्त सदाशिवराव यादवराव साळुंके यांचे वृद्धापकाळाने रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय ८६ वर्षे होते.
कै. सदाशिवराव साळुंके यांच्या पच्यात चार भाऊ,तीन मुले,दोन मुली सूना,नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. नेवासा येथील व्यापारी व मार्केट कमिटीचे माजी उपसभापती देवीदासराव साळुंके,व्यापारी विठ्ठलराव साळुंके,प्रकाश साळुंके यांचे ते वडील होते.
नेवासा येथील अमरधाममध्ये सोमवारी सकाळी ११ वाजता सदाशिवराव साळुंके यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी विविध संस्था सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. वारकरी संप्रदायातील निस्सीम भक्त म्हणून ते परिचित होते मूळचे भानसहिवरा येथील रहिवासी असलेले सदाशिवराव साळुंके हे जुन्या पिढीतील भुसार मालाचे व्यापारी होते.नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे ते विश्वस्त होते.सन १९८५ ते १९८० या कालावधीत नेवासा मार्केट कमिटीचे व नेवासा तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले होते तर संत ज्ञानेश्वर देवस्थानच्या माध्यमातून गुरुवर्य बन्सी महाराज तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले धार्मिक योगदान त्यांनी दिले नंतर स्व:त राजीनामा देऊन त्यांनी हरिभक्त परायण शिवाजी महाराज देशमुख यांना संस्थानवर घेण्याची त्यांनी शिफारस केली होती
प्रत्येक पारायण सहभाग घेऊन अन्नदानाच्या माध्यमातून योगदान देऊन नित्यनेमाने ज्ञानेश्वरीचे वाचन ते करत होते.
त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायात भक्तगणांत समाजात दुःख व हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget