नेवासा(प्रतिनिधी)
नेवासा बुद्रुक शिवारात असलेल्या सदगुरू नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठानमध्ये बांधण्यात आलेल्या सदगुरू नारायणगिरी महाराज यांच्या मंदिरातील सभामंडपाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अहमदाबाद येथील जेष्ठ बंधू सोमाभाई मोदी यांच्या हस्ते बुधवारी दि.२३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी करण्यात आले.अध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या सदगुरू नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार सोमाभाई मोदी यांनी यावेळी बोलताना काढले.
नेवासा बुद्रुक शिवारातील सुरेगाव रस्त्यावर असलेल्या सदगुरू नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठान प्रांगणात गुरुवर्य उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सद्या प्रतिष्ठान प्रांगणात उभारण्यात आलेल्या सदगुरू नारायणगिरी महाराजांच्या मंदिरामध्ये मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून या सप्ताहाला सोमाभाई मोदी यांनी सदिच्छा भेट दिली.यावेळी त्यांच्या हस्ते मंदिरासमोर उभारण्यात आलेल्या सभामंडपाचे उदघाटन करण्यात आले.यावेळी झालेल्या धामिर्क कार्यक्रमाचे पौरोहित्य वेदशास्त्रसंपन्न गणेशदेवा कुलकर्णी यांनी केले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी सोमाभाई मोदी समवेत त्यांच्या धर्म पत्नी सौ.चंद्रिकाबेन मोदी हभप पांडुरंग महाराज गिरी वावीकर,हभप बाळा महाराज खरात,आदर्शगाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, चंद्रभान महाराज चौधरी,पंडितराव थोरात,पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे,शंकरराव लोखंडे, नगरसेवक इंजिनियर सुनीलभाऊ वाघ,हभप विश्वनाथ मंडलिक, जिल्हा बँकेचे रावसाहेब वर्पे, सुदामभाऊ मंडलिक,संजय पवार,राजेंद्र ठाणगे, दीपक ठाणगे,मेजर धर्मराज ठाणगे, मेजर मंगेश ठाणगे, दत्तात्रय पादीर,पुणे येथील उद्योजक रविंद्र मुनोत नेवासकर,वरद विनायक देवस्थानचे कचरू पाटील निर्मळनाना आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सोमाभाई मोदी यांनी गुरूंबद्दल असलेल्या श्रद्धेला जपण्याचे गुरूंमुळे ज्ञानाद्वारेच मनुष्य जीवाचा उध्दार केला असल्याचे सांगत गुरूबद्दल असलेला महिमा विषद केला.अशा या धार्मिक संस्थानच्या माध्यमातून संस्काराची समृद्धी होत राहो अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी हभप उद्धव महाराज मंडलिक यांनी हिंदी मध्ये सोमाभाई मोदी यांच्या कार्याचा परिचय करून दिला. मोदीजींनी देशाची मान जगात उंचाविण्याचे कार्य केले. प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने भक्ती भक्तिभावाने केली जाते त्याच प्रमाणे वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून महाराष्ट्रात विविध जातीच्या धर्माच्या संतांनी एकत्रित येऊन राष्ट्रीय ऐक्याची निर्मिती केली असल्याचे सांगितले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी याच ठिकाणी थांबून विश्व ची माझे घर हा संदेश दिला असल्याचे मोदींजींना सांगितले.
यावेळी सोहळा संयोजक गुरुवर्य उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या उपस्थितीत आदर्शगाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्या हस्ते सोमाभाई मोदी यांचा सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
पोपटराव पवार यांनी आपल्या भाषणात नेवासे ही तपोभूमी असल्याची ओळख सोमाभाई मोदींना करून दिली.या भूमीचा सन्मान झाल्याचे त्यांनी सांगितले व आदर्श गाव हिवरे बाजारला यायचे आमंत्रण दिले.मी एकटाच मोदींजींचा भाऊ नसून देशातील १३० करोडची जनता नरेंद्र मोदी यांचे भाऊ बहीण आहे त्याचप्रमाणे मी आहे असे भावनिक उदगार काढले.व गुरुवर्य उद्धव महाराजांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या सदगुरू नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठानच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे,कृषी तज्ञ एकनाथराव भगत,राजेंद्र मापारी,सुदामराव खजिनदार, अशोक टेकणे,किशोर गारुळे, बाबासाहेब महाराज सातपुते यांच्या सह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment