शनिशिंगणापूर मंदिरात ‘प्रसादा’ऐवजी मिळणार लिंबाचे रोप

पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी । अमोल म्हस्के
कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर तुमच्या हातात प्रसाद मिळतोच. आता प्रसादाच्या रूपाने थेट गोड पदार्थ मिळण्याऐवजी नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील शनी शिंगणापूर येथील मंदिरात येणाऱ्या लाखो भाविकांना लिंबाचे रोप मिळणार आहे. भाविकांनी ते रोप घेऊन, घराच्या परिसरात त्याचे वृक्षारोपण करावे, अशी त्यामागची भावना आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत या योजनेची अंमलबजावणी होणार आहे.

प्रसादात बर्फीऐवजी आता लिंबाचे रोप दिले, तर येणाऱ्या एकूण भाविकांपैकी १० टक्के झाडे लावली, तर ती झाडे मोठी होऊन पर्यावरणाचे रक्षण करणे शक्य होईल, या हेतूने हा निर्णय घेतला आहे.  सर्वच भाविकांना सुरुवातीला रोप देणे शक्य नाही. मात्र, उपलब्धतेनुसार रोप देऊ. शनी अमावस्येला महाराष्ट्राच्या विविध भागांसह गुजरात, दिल्ली या राज्यांतूनही भाविक दर्शनासाठी येतात. हा स्तुत्य उपक्रम आम्ही राबविणार आहोत.'

लिंबाचे रोप का?
शनी महाराज मंदिराशेजारी लिंबाचे झाड आहे. प्रसाद म्हणून लिंबाचे रोप देण्याचा निर्णय घेण्यात आला. लिंबाच्या झाडाच्या पालापाचोळ्यापासून मूळापर्यंत सर्वांत आयुर्वेदिक औषधी गुणधर्म आहेत. त्यासाठी आयुर्वेदाचा वापर वाढू शकतो. त्यासाठी लिंबाचेच रोप देण्यात येणार आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget