पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी । अमोल म्हस्के
जनावरांना चारा म्हणून वापरल्या जाणाऱ्या मका पिकावर लष्करी अळ्या पडल्याने मका जनावरांना चारा म्हणून उपयोग होत नसल्याने तसेच खाद्यान्नचे भाव कडाडल्याने गायी- म्हशीचे दूध देण्याचे प्रमाण कमी झाल्याने पशुपालक चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.ऐन सणासुदीच्या काळात सर्व सामान्यांना याचा फटका बसत आहे.
गायी म्हशींना दूधवाढीसाठी खाद्यान्न म्हणून सरकीची पेंड,गव्हाचा भुसा दिला जातो.याचे भावही वाढलेले आहेत.पाऊसही पुरेशा प्रमाणात झाल्याने माळरानावर हिरवे गवत थोड्याफार प्रमाणात आहे.शेतातील पिकावर रोग पडल्याने याचा परीणाम दूध उत्पादनावर झाल्याचे दिसून येते.

Post a Comment