पवार यांच्या श्रीगोंदा येथील सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी.

तेरा वर्षे मंत्री पद मिळाले असताना काही करता आले नाही अशांनी बांगड्या भराव्या-राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पाचपुते यांच्यावर टीका. 

विसापूर प्रतिनिधी
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार घनश्याम शेलार यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार श्रीगोंद्यात सभा झाली.या सभेला अलोट गर्दी पाहण्यास मिळाली.ही आज पर्यंतच्या सभांचे तुलनेत ही रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती. 
यावेळी शरद पवारांनी पाचपुतेंवर टीकास्त्र सोडले.माजी मंत्री पाचपुते यांनी काष्टी येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेत केलेल्या भाषणाचा धागा पकडून शरद पवार म्हणाले मी मुख्यमंत्री असतांना वनमंत्री हे महत्वाचे खाते माझ्याकडे घेतले होते.कारण वनसंपत्ती वाढवणे काळाची गरज आहे.तीच जिम्मेदारी पाचपुतेनां देण्यात आली होती.त्याचबरोबर आदिवास कल्याणासाठी आदिवास खातेहि त्यांना देण्यात आले.सुमारे १३ वर्षे पाचपुते यांना मंत्रिपद देऊनही त्यांना काम करता आले नाही. तर अश्यांनी बांगड्या भरल्या पाहिजेत.असे पवारांनी यावेळी भाषणात नमूद केले.नगरला जातांना काष्टीच्या आसपास डाव्या हाताला मोठे बांधकाम दिसते.मला वाटले तो एखादा महाल अथवा मोठे रिसोर्ट असेल.मात्र नंतर समजले की आपण ज्याना वेगवेगळ्या प्रकारे संधी दिली त्यांनी हे बांधकाम केले आहे.बांधकाम करा कारखाने काढा.मात्र,दोन वर्ष्यांपासून कामगारांचे थकलेले पैसे आणि शेतकऱ्यांचे बिल तेवढे द्या.कारण घाम गाळून केलेल्या कष्टाचा मोबदला जर दिला नाही.तर त्यांचा तळतळात लागतो. आणि मग कोठेही यश मिळत नाही. आ. राहुल जगताप यांच्याविषयी बोलतांना पवार म्हणाले कि,शेतकऱ्यांची थकलेली बिल द्यायची आहेत.अडचणी आहेत.ते दिल्याशिवाय गत्यंतर नाही.शेतकऱ्यांचे एक वेळेत बिल दिले गेले नाही म्हणून,राहुलला झोप येत नाही.अशी भूमिका असणारा व वडिलांची गादी चालवणार हा कर्तुत्वान मुलगा असल्याचे  सांगितले. 
राष्ट्रवादी सरकारच्या काळात श्रीगोंदा शहराला रस्ते विकासासाठी ३३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले.पथ दिव्यांसाठी ५ कोटी रुपये मजूर करण्यात आले.लेंडी नाला शुसोभीकरणासाठी ६ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला.त्याचबरोबर नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारती साठी २ कोटी रुपये मंजूर केले.योजना जनतेच्या हितासाठी वापरायच्या असतात,असे संस्कार महारष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आमच्यावर केले असल्याचे प्रतिपादन पवार यांनी या जाहीर सभेच्या निमित्ताने केले आहे.शिवाय धन शक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय करण्यासाठी,घनश्याम शेलारांना निवडून देण्याचे आवाहनहि उपस्थितांना केले आहे.
या जाहीर सभेचे अध्यक्षस्थानी माजी खासदार दादा पाटील शेळके हे होते.सभेचे सूत्रसंचालन स्मितल भैय्या वाबळे यांनी केले.यावेळी राजकुमार लोखंडे,निसार बेपारी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला असून,संभाजी ब्रिगेडच्या अरविंद कापसे यांनी पवार साहेबांना बळीराजाची प्रतिमा भेट देत पाठींबा दिला आहे.
कार्यक्रमात बाबासाहेब भोस,आ.राहुल जगताप,घनश्याम शेलार,हरिदास शिर्के,ऋषिकेश गायकवाड,व दीपक भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सोमनाथ धूत,दादा कळमकर यांच्यासह श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदार संघातील बहुसंख्य कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.कालच्या सभेपेक्षा जास्त लोक आजच्या सभेस असल्याची चर्चा येथे होती.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget