बोधेगाव - वार्ताहर
शेवगाव पाथर्डी मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांनी मित्र पक्ष असलेल्या शिवसंग्राम चे संस्थापक आ विनायक मेटे यांचा फोटो छबी टाकली नसल्याने कार्यकर्त्यांत नाराजी व्यक्त होऊन भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेण्याचा निर्णयामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत एकच खळबळ उडाली आहे
महाराष्ट्र राज्य विधानसभा पंचवार्षिक निवडणूक 2019 साठी राज्यात भारतीय जनता पार्टी शिवसेना, रयत क्रांती,आरपीआय, रासपा, शिवसंग्राम यांची यांची होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी युती जाहीर होऊन जागा वाटप निच्छित केले आहे शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघात भाजपाचे उमेदवार व विद्यमान आ मोनिका राजळेंनी पक्षाचे जाहीर पत्रक , व उमेदवाराचे फलक मतदारसंघात लावण्यात आले आहे त्यामध्ये भाजपा- शिवसेना रासपा, आरपीआय, रयतक्रांती, या पक्षाच्या नेत्यांचे फोटो सदर फलकावर छायाचित्रे छापण्यात आले आहेत मात्र शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक आ विनायक मेटे साहेब यांचे छायाचित्र सदर युतीच्या उमेदवारांच्या फलकावर कोठेही छापण्यात आले नाही त्यामुळे शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील शिवसंग्राम पक्षाच्या कार्यकर्त्यांत तीव्र नाराजी व्यक्त होऊन मोठा संताप व्यक्त होत आहे तसेच सदर निवडणूक प्रचार दरम्यान शिवसंग्राम पक्षाच्या पदाधिकार्यांना विश्वासात घेतले गेले नाही शिवसंग्राम पक्षाच्या मतांची भाजपाच्या उमेदवाराला गरज दिसत नसल्याने शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष नवनाथ इसारवाडे यांनी सदर बाब तातडीने पक्षाच्या वरिष्ठ नेते आ विनायकजी मेटे यांना कळवली आहे शिवसंग्राम पक्षाची भाजपाला गरज नसल्याने भाजपा युतीच्या उमेदवार आ मोनिका राजळे यांच्या विरोधात मतदान करण्याचा निर्णय आज शनिवारी पक्षाच्या शेवगाव येथे जिल्हाध्यक्ष मच्छिन्द्र सुद्रीक, तालुकाध्यक्ष नवनाथ इसारवाडे पाथर्डी चे तालुकाध्यक्ष परमेश्वर टकले आदी पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत एकमुखी निर्णय करण्यात आला आहे त्यामुळे शेवगाव मतदार संघात कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा आहे हे वरिष्ठांच्या आदेशानुसार लवकरच ठरविण्यात येणार आहे त्यामुळे सध्या भाजपा युती मित्रपक्षाचे प्रचारात आमचा कोणताही सहभाग नसणार आहे अशी माहिती श्री इसारवाडे यांनी दिली
शेवगाव मतदार संघात भाजपात उमेदवारी साठी मोठी स्पर्धा होती आ राजळे यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नसल्याने मोठा असंतोष निर्माण झाला झाल्याने नाराज नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे आ मोनिका राजळे हटाव ही उघड भूमीका घेतली त्यामध्ये भाजपच्या नितीनराव काकडे, दिलीपराव लांडे, बाळासाहेब सोनवणे, दिनकर पालवे, मोहनराव पालवे, संजय बडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी बंड पुकारले पाठोपाठ शिवसंग्राम पक्षाच्या नेत्यांनी भाजपा च्या विरोधात भूमिका घेतल्याने आ राजळेच्या अडचणीत भर पडली गेली आहे

Post a Comment