शेतातील कापूस वेचनीला सुरवात

पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी । अमोल म्हस्के
पाथर्डी तालुक्यात या वर्षी  दोन-तीन पाऊसावर आलेले कापूस पीकाच्या वेचणीला सुरवात झाली आहे.पाऊसाचे प्रमाण या वर्षी अत्यंत कमी असल्याने शेतातील कपाशी पिकाची वाढ कमी झालेली आहे.कपाशीच्या झाडांना  येणाऱ्या बोंडाचे प्रमाण खूपच कमी आहे.कारण झाडावर लष्करी अळ्या पडल्याने झाडाची वाढ कमी झाली आहे.कासार पिपंळगाव, पाडळी, साकेगाव, पागोरी पिपंळगाव परीसरात शेतातील कापूस वेचणीला सुरवात झाली आहे.कापूस वेचणी सात रुपये किलो प्रमाणे चालू आहे.तसेच कापूस उत्पादनात माञ घट होण्याची शक्यता आहे.कारण झांडाना बोडांचे प्रमाण कमी आहे.शेतकऱ्यांना कापूस पिकाला शेतात केलेला नांगरट,बी-बियाणे,पेरणी,खते,खुरपणी याचा खर्च निघेल याची चिंता वाटते. कापूस प्रमुख पीक मानले जाते.
या वर्षी चांगला पाऊस होवून कापसाचे भरघोस उत्पादन होऊल अशी आशा शेतकऱ्यांना  होती.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget