पाथर्डी शेवगाव- प्रतिनिधी | अमोल म्हस्के
पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने ग्रंथालय चळवळीचे प्रेरणास्रोत माजी राष्ट्रपती डॉ एन.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ए पी जे अब्दुल कलाम वाचनकट्टाची निर्मीती करण्यात आली असून या कट्ट्याचे उद्घाटन ग्रंथालय कृती समितीचे तालुकाध्यक्ष संजय कराळे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक महेबुब पठाण होते . यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य विष्णुपंत पवार,महेश कुलकर्णी, नवनाथ तळेकर,दत्तु आठरे , अझम पठाण , धोंडीराम पवार आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्तविक व आभार ग्रंथपाल प्रदिप पवार उपस्थित मान्यवरांचे मानले.

Post a Comment