चुरशीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे शेलार पराभूत
विसापूर
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात भाजपचे बबनराव पाचपुते यांनी चुरशीच्या निवडणुकीत विजय मिळविला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार घनशाम शेलार यांच्यावर ४ हजार ७४० मतांनी विजय मिळविला.
गुरूवारी सकाळी मतमोजणीस प्रारंभ झाला. प्रत्येक फेरीत पाचपुते-शेलार यांच्या मतांची आघाडी कमी जास्त होत होती. मागील वेळेस पाचपुते यांचा राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांनी पराभव केला होता. परंतु यावेळी जगताप यांनी कुकडी कारखान्याच्या व शेतकºयांच्या हितासाठी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. यामुळे राष्ट्रवादीने घनशाम शेलार यांना उमेदवारी दिली. नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनीही भाजपमध्ये प्रवेश करुन पाचपुते यांना बळ दिले. दरम्यान शेलार यांच्या बाजूने आमदार राहुल जगताप यांनी आपली ताकद उभी केली होती. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित पवार यांनीही शेलार यांना ताकद दिली होती. पाणी प्रश्न, दुष्काळाचे प्रश निवडणुकीत महत्वाचे ठरले. परंतु भाजपचे सरकार सत्तेत असल्याने याचा फायदा पाचपुते यांना झाला.राहुल जगताप यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याने घनश्याम शेलार यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळताच पाचपुते यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करुन एकतर्फी विजयाच्या वल्गना केल्या.पाचपुतेंचे कार्यकर्ते सत्तर ते पंचाहत्तर हजार मताधिक्याने विजय मिळेल हा करत होते तो फोल ठरला.मात्र शरद पवार यांची श्रीगोंदा येथील सभा पाहून त्यांचे पाय जमिनीवर आले.सहज विजय मिळेल अशी अपेक्षा करणा-या पाचपुते यांना शेवटच्या फेरीतील मतमोजणीची वाट पहावी लागली.एवढी चिवट झुंज शेलार यांनी दिली.पाचपुते यांच्या पेक्षा शेलार यांची उमेदवारी निश्चितच सर्वसामान्य अशी होती.पाचपुते यांनी श्रीगोंदा मतदारसंघातून अनेक वेळा प्रतिनिधीत्व केले आहे.

घनश्याम शेलार-97,980
बबनराव पाचपुते-1,02,403
अटीतटीच्या लढतीत भाजप च्या बबनराव पाचपुतेंचा विजयी
एकूण 4,750 मतांनी पाचपुतें विजयी

Post a Comment