नामदार विखेंचे कट्टर समर्थक क्रांतिकारीच्या बॅटवर उतरले राजकिय मैदानात !
नेवासा,(प्रतिनिधी)
स्वतंञ नेवासा विधानसभा मतदार संघात निवडणूकीचा जोर शेवटच्या टप्प्यात वाढला आसून भाजपाचे जयहरी उमेदवार आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना तगडे आवाहन क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाखांकडून उभे केले जात आसतांनाच नगर जिल्ह्याचे किंगमेकर राज्याचे गृहनिर्माणमंञी राधाकृष्ण विखे - पाटील यांचे नेवाशातील कट्टर समर्थकांनी क्रांतिकारी पक्षाची बॅट हातात घेवून चक्क मैदानात उतरल्याने निवडणूकीच वार्र फिरल्याचे दिसून येत आसून गडाखांच्या विजयासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील मैदानात उतरल्याने आता ठरलय अन् वार फिरलय त्यामुळे शंकरराव गडाख पाटील यांचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचा राजकिय निरिक्षकांचा व्होरा आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील अन् जिल्ह्याचे किंगमेकर विखे पाटलांचे कट्टर समर्थकांनीच क्रांतिकारीची बॅट राजकिय मैदानात घेवून उतरल्यामुळे शंकरराव गडाख यांचे पारडे मोठे जड झाले आहे.त्यामुळे शेवटच्या टप्प्यात जयहरींचे उलटे वारे फिरले गेले आसून शेवटच्या टप्प्यात कोण कोणत्या क्लृप्त्या आखून मतदार राजांना भूरळ घालतय याकडेच राजकिय निरिक्षकांचे लक्ष लागून आहे.
आम्ही विखे पाटलांचे कट्टर समर्थक आहोत आणि राहणार आहे नेवाशात माञ जयहरीकडे आमचा पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा होता पण सार गणितच उलट झाल गेल्या पाच वर्षात कधी आम्हाला विचारल नाही त्यामुळ यावेळेस जयहरीला हिसका दाखवणार आसून आम्ही यावेळेस बॅट घेवून मैदानात उतरलो आसल्याचे आमच्या नेत्याला कल्पना दिलेली आहे. त्यांनी आम्हाला अस काही करु नका असे सांगितले आसले तरी आम्ही तसच करुन यावेळेस षटकार मारणार आहोत.
शकिल बागवान (कट्टर विखे समर्थक)
नेवासा

Post a Comment