विसापूर
सुरेगाव ता.श्रीगोंदा येथील प.पु.आनंदाश्रम स्वामींच्या मठात सध्या चातुर्मासा निमित्ताने विविध कार्यक्रम चालू आहेत.
या चातुर्मासाच्या सत्रात रविवार दि.१३ रोजी कोजागरी पौर्णिमेचे औचित्य साधून हभप पांडुरंग महाराज क्षिरसागर(आळंदी) यांचे सांयकाळी ७ ते ९ दरम्यान किर्तन आयोजित करण्यात आले आहे.या किर्तन सेवेचे व महाप्रसादाचे आयोजन उखलगाव येथील हभप नामदेव महाराज वाळके व सुरेगाव येथील संतोष संपत रोडे यांनी केले आहे.आनंदाश्रम स्वामींचे मठात मंगळवार दि.१७ जुलै या गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तापासुन चातुर्मासा समारंभास सुरवात झाली आहे. तेव्हापासून या ठिकाणी दररोज अखंड भजन व मान्यवर महाराजांची किर्तन सेवा चालू आहे.या ठिकाणी दररोज येणाऱ्या भाविकांकरीता सायंकाळी महाप्रसादाची व्यवस्था केली जात आहे.या सर्व कार्यक्रमांसाठी परिसरातील आनंदाश्रम स्वामींचे भक्त सहकार्य करत असल्याचे देवस्थान समितीचे अध्यक्ष मनमोहनसिंग कोचर,सचिव हभप दिलीप काका कुलकर्णी व व्यवस्थापक संतोष शिंदे यांनी सांगितले.

Post a Comment