राम शिंदेंच्या विजयासाठी जिल्हा बँकेचे संचालक जगन्नाथ राळेभात उतरले निवडणूकीच्या मैदानात

जामखेड | प्रतिनिधी 
पालकमंत्री प्रा राम शिंदे यांच्या विजयासाठी जिल्हा बँकेचे संचालक तथा विखे गटाचे जेष्ठ नेते जगन्नाथ तात्या राळेभात यांनी कंबर कसली असून राळेभात यांच्या पुढाकारातून सोमवारी जामखेड तालुक्यातील सेवा संस्थांचे चेअरमन, संचालक तसेच विखे समर्थकांच्या मेळाव्याचे जामखेड शहरात आयोजन करण्यात आले होते. यावेळी विखे समर्थकांनी पालकमंत्री प्रा राम शिंदे यांच्या विजयासह मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार या मेळाव्यात केला. 

या मेळाव्यासाठी स्वता: पालकमंत्री प्रा राम शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक जगन्नाथ तात्या राळेभात, जेष्ठ नेते किसनराव ढवळे, जामखेड बाजार समितीचे संचालक सुधीर राळेभात, सुभाष जायभाय, पंचायत समिती सदस्य डाॅ भगवानराव मुरूमकर, सरपंच दादा वारे, मारूती करगळ सह आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री राम शिंदे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत मतदान पार पडेपर्यंत कोणीही गाफील राहू नका. यंदाच्या निवडणूकीत प्रत्येक कार्यकर्ता हा स्वता:च उमेदवारी आहे असे समजून एकदिलाने काम करा. गटतट,रूसवे फुगवे बाजूला ठेऊन बारामतीचे अतिक्रमण रोखण्यासाठी सर्व ताकद पणाला लावा. मंत्रीपदाच्या माध्यमांतून मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली.भविष्यातही तुम्हा सर्वांना सोबत मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलवायचा आहे. सर्वांच्या साथीने मतदारसंघाला राज्यात विकासाचे नवे माॅडेल बनवू. विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता  गावागावातून मोठे मताधिक्य द्या, यंदाची निवडणूक विकासाच्या बळावर जिंकणार असा ठाम विश्वास व्यक्त करत अगामी काळात जगन्नाथ तात्यांना जिल्हा बँकेत बिनविरोध पाठवण्यात येईल असे राम शिंदे म्हणाले.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget