सदगुरू नारायणगिरी महाराजांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन-ह.भ.प.उद्धव महाराज

नेवासा,(प्रतिनिधी)
सदगुरू नारायणगिरी महाराजांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा निमित्ताने नेवासा बुद्रुक शिवारातील सुरेगाव रस्त्यावर असलेल्या सदगुरू नारायणगिरी महाराज
प्रबोधन प्रतिष्ठानच्या प्रांगणात शनिवार दि.१९ ऑक्टोबर ते शुक्रवार दि.२५ ऑक्टोबर या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती
सोहळयाचे प्रमुख संयोजक समाजप्रबोधनकार हरिभक्त परायण उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांनी दिली.
       या सोहळयाबाबत माहिती देतांना ह.भ.प.उद्धव महाराज म्हणाले की योगीराज गंगागिरी महाराज,सदगुरू किसनगिरीबाबा,सदगुरू नारायणगिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने सदगुरू नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठानच्या माध्यमातून भाविक भक्तांच्या आर्थिक योगदानातून प्रतिष्ठानच्या प्रांगणात हेमाडपंथी शिल्पकलेचे दगडी बांधकाम असलेले मंदिर बांधण्यात आले असून या मंदिरात सदगुरू नारायणगिरी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे.
      मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळया निमित्ताने दि.१९ ऑक्टोबर ते शुक्रवार दि.२५ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये पहाटे काकडा भजन,सकाळी ६ ते ७ विष्णू सहस्त्रनाम,७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण,दुपारी ११.३० १२.३० संतपूजन,दुपारी ३ ते ४.३० संगीत भजन,सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ,सायंकाळी ७ ते ९ नामवंतांची कीर्तने होणार आहे.
    शुक्रवारी दि.२५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते ११ यावेळेत मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा अहमदाबाद येथील जेष्ठ समाजसेवक सोमाभाई मोदी,त्र्यंबकेश्वर येथील महंत सागरानंद महाराज,श्री क्षेत्र देवगडचे गुरुवर्य भास्करगिरी महाराज,भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज, कॅप्टन अशोककुमार खरात,कोपऱगाव येथील रमेशगिरी महाराज,तारकेश्वर गडाचे आदिनाथ शास्त्री महाराज,महंत परमानंद महाराज यांच्या हस्ते व अनेक संत महंतांच्या उपस्थितीत वेदमंत्राच्या जयघोषात होणार आहे.त्यानंतर गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या काल्याच्या किर्तनाने या सोहळ्याची सांगता होणार असून या कालावधीत  कीर्तनासह होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सोहळा संयोजक उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांनी केले आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget