बोधेगाव दि १५ (प्रतिनिधी)
बोधेगाव येथील जागृत देवस्थान व हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतिक असणाऱ्या श्री साध्वी बन्नोमा दर्गा यात्राउत्सव सालाबाद प्रमाणे आज बुधवार दि.१६ ओक्टोबर पासून प्रारंभ होणार असल्याने यात्रेची जय्यत तयारी पूर्ण होऊन विविध व्यवसाईक दाखल झाले आहेत उत्सवा निम्मित चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील ग्रामदैवत असलेल्या व नवसाला पावणाऱ्या श्री साध्वी बंनोमा दर्गा यात्राउत्सव सालाबाद प्रमाणे साजरा होत असून यात्रेस आज बुधवार दि.१६ रोजी रात्री कावडीने आणलेल्या गंगेच्या पाण्याने संदल च्या भव्य मिरवणूकीने गंगास्नान झाल्यानंतर यात्रेस प्रारंभ होतो दि.१७ रोजी गुरवारी रात्री छबिना मिरवणूक व राज्यातील नामवंत तमाशा कलाकार आपली कला सादर करतात दि.१८ शुक्रवारी दुपारी कुस्त्यांचा जंगी हगामा व रात्री तमाशासह कव्वालीचा शानदार मुकबला सामना रंगणार आहे तर दि.१९ रोजी शनिवारी यात्रेत आलेल्या कलाकारांचा हजेऱ्याचा कार्यक्रम होऊन यात्रेची सांगता होणार आहे चार दिवस चालणाऱ्या या यात्राउत्सवात राज्यातून व परराज्यातून व्यावसायिक येत आसतात तर नगर सह मुंबई, पुने, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, सोलापूर, उस्मानाबाद हुन लाखो भाविक हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असणाऱ्या बंनोमाच्या दर्शनासाठी येतात.ग्रामीण भागातील या यात्रेत पानफुल, प्रसाद, मिठाई, मौत का कुवा,रहाट पाळणे, विविध करमणुकीचे खेळ व विविध व्यावसाईक दुकाने मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. चार दिवसात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असल्याने लाखो रुपयाची आर्थिक उलाढाल याठिकाणी होते. दर्गा परिसराची रंगरंगोटी करण्यात आली आसुन यात्राउत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. भाविकांच्या सोयीसाठी व स्वागतासाठी यात्रा पंच कमेटी सज्ज झाली असल्याची माहिती पंचकमेटीचे अध्यक्ष कुंडलिकराव घोरतळे, गावचे माजी जि.प. सदस्य तथा उपसरपंच नितीन काकडे व सचिव अभय चव्हाण यांनी दिली आहे.

Post a Comment