नेवासा शहरातील असंख्य युवकांचा क्रांतीकारी शेतकरी पक्षात प्रवेश

युवकांच्या प्रवेशामुळे क्रांतिकारीचे पारडे जड

नेवासा(प्रतिनिधी)
नेवासा शहरातील असंख्य युवकांनी क्रांतीकारी शेतकरी पक्षात प्रवेश केला प्रवेश करणाऱ्यांमध्ये युवकांची संख्या जास्त असून भाजपच्या काही कार्यकर्त्यांचा ही समावेश होता. रोज होणाऱ्या प्रवेशामुळे या निवडणुकीत  क्रांतिकारीचे शेतकरी पक्षाचे पारडे जड झाले असून दिवसेंदिवस क्रांतिकारीची ताकद वाढतांना दिसत आहे.
       बुधवारी दि.९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार श्रीश्री शंकरराव गडाख पाटील उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील,राजेंद्र चौधरी, भाऊसाहेब वाघ, अस्लमभाई मन्सूरी सुनील जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या प्रवेश कार्यक्रमाप्रसंगी नेवासा शहराच्या विविध प्रश्नांसाठी अभिनव आंदोलनाच्या माध्यमातून लढा देणारे मी नेवासकर ग्रुपचे अध्यक्ष शांताराम गायके तसेच सामाजिक कार्यकर्ते व साप्ताहिक संपादक संघटनेचे सदस्य रमेश राजगिरे यांच्या समावेश असून नेवासा शहरातील प्रभाग क्रमांक एक व तीन मधील कार्यकर्ते मुकुंद तवले,रविंद्र खंडागळे,मयूर वंजारे,विजय शिंदे,संत सावता युवक मंडळाचे कार्यकर्ते संदीप शिंदे, भाऊसाहेब माळी,अमोल पिटेकर,सोमनाथ खरात,अनिल तवले,मनोज शिंदे या कार्यकर्त्यांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षात प्रवेश केला.
          नेवासा खुर्द ग्रामपंचायत असतांना त्यावेळचे माजी सदस्य मिलिंद नागे व शिवा राजगिरे या भाजपच्या कार्यकर्त्यांनी क्रांतिकारीत याअगोदरच प्रवेश केल्यानंतर त्यांनी मी  नेवासकर ग्रुपचे शांताराम गायके, सीताराम व्यवहारे, समीर सय्यद, सुनील कणगरे, विशालगवांदे, अशोक खडे,गंगाराम कणगरे, रविभाऊ भोसले राजुभाऊ कणगरे, राहुल कणगरे,नितीन कांबळे,सागर भास्कर यांचे मनपरिवर्तन झाल्यानंतर त्यांनी क्रांतिकारी पक्षात प्रवेश यावेळी प्रवेश केला.त्यानंतर श्रीकृष्ण तरुण मंडळाचे मार्गदर्शक नगरसेवक संदीप बेहळे यांच्या  पुढाकाराने गरुटे फोटो स्टुडिओ या फर्मचे प्रमुख रामनाथ गरुटे,दत्तू आगळे,अक्षय गव्हाणे,आकाश गव्हाणे,मनोज विश्वास, सोनू भारस्कर, वृषभ साठे, रियाज पिंजारी, ऋतिक खेतरे, यश गरुटे, अरबाज पिंजारी, सागर गव्हाणे, रविंद्र मापारी यांनी प्रवेश केला प्रवेश करणारे सर्व युवा कार्यकर्ते हे शहरातील असून युवकांच्या या प्रवेशाने दिवसेंदिवस क्रांतिकारीची ताकद  वाढत चाललेली दिसत आहे. 
        प्रवेश कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित युवा कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करत पाठीवर थाप टाकत कामाला लागा असे आवाहन यावेळी शंकरराव गडाख यांनी केले तर भाऊसाहेब वाघ यांनी उपस्थित युवा कार्यकर्त्यांचे आभार मानले.

मक्तापुरचे माजी सरपंच पूनमचंद साळवेचा प्रवेश
नेवासा तालुक्यातील मक्तापुर ग्रामपंचायतचे माजी सरपंच यांनी देखील सद्याचे गडाख यांचे वातावरण पहाता त्यांनी देखील असंख्य कार्यकर्त्यांसमवेत क्रांतिकारी पक्षात प्रवेश केला शंकरराव गडाख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मक्तापुरचे जेष्ठ नेते रामकृष्ण कांगुणे व गिडेगाव येथील मागासवर्गीय नेते व मुळा कारखान्याचे संचालक कडूबाळ गायकवाड उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget