नेवासा(प्रतिनिधी)
नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्यावतीने इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी जागतिक टपाल दिनानिमित्त "पत्रास कारण की..मतदान जनजागृती" हा उपक्रम राबवला या उपक्रमाचे अनेकांनी तोंडभरून कौतुक केले.
सदर उपक्रमांतर्गत जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून मुलांनी टोका येथील पोस्टर ऑफिसला भेट दिली व तेथील कामकाजाची माहिती घेतली.पोस्टकार्डवर मतदानाविषयी माहिती व मतदान जनजागृती विषयी सुंदर हस्ताक्षरात घोषवाक्ये लिहून सदर पोस्टकार्ड पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन टपाल पेटीत टाकले व आपल्या काका,मावशी,आत्या व मामा यांना पाठवले.आज हे चिमुकले विद्यार्थी मतदानाचा हक्क बजावण्याचा आग्रह आपल्या पाहूण्यांना व नातेवाईकांना करत आहे.
"पूर्वीच्या काळी निरोप पोहचविण्यास किंवा खुशाली विचारण्यास पोस्टातील पत्रांचा वापर केला जात होता.आधुनिक युगात सोशल मिडियामुळे जग अगदी जवळ आले आहे.मोबाईलच्या जमाण्यात लोकांना पत्राचा विसर पडला आहे.म्हणून आज जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून मतदान जागृती करण्याच्या उद्देशाने पोस्टकार्ड चा उपयोग करण्यात आला होता.
प्रवरासंगम येथील पोस्ट ऑफिस मध्ये पोस्ट मास्तर शिवाजी कदम यांनी विद्यार्थ्यांना पोस्ट ऑफिसच्या कामकाजाची माहिती सांगितली.विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या पत्रांचे त्यांनी कौतुक केले....सदर उपक्रमाचे आयोजन वर्गशिक्षिका श्रीमती शितल झरेकर यांनी केले तर याकामी त्यांना मुख्याध्यापक व सर्व सहकारी शिक्षकवृंदाचे सहकार्य लाभले

Post a Comment