मतदारांना जागृत करण्यासाठी ७१ वर्ष वय आसणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याची धडपड !

नेवासा,(प्रतिनिधी)
विधानसभा निवडणूकीचा बिगूल वाजल्यापासून लोकशाहीचा हक्क बजावून उमेदवारांनी मतदारांत पाच वर्ष राहून लोकांची निस्वार्थीपणे सेवा करणाऱ्या उमेदवारालाच निवडून देण्याचे आवाहन करण्यासाठी तालूक्यातील पाथरवाला येथील वय वर्ष ७१ आसणाऱ्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते एकनाथ राऊत यांनी गल्ली बोळात स्वता: पायी फिरुन समाजप्रबोधनपर प्रचार करत मतदारांना जागे करण्याचा अभिनव उपक्रम तालूक्यात हाती घेतल्याने मतदारांतून त्यांचे उत्स्फुर्त स्वागत होतांना दिसून येत आहे.
  वयोवृद्ध कार्यकर्ते राऊत यांचा ना पार्टी ना पक्ष,ना नेता असे आसतांना उमेदवारांच्या कणभर पुढे जावून मतदारांचे ते प्रबोधन करतांना दिसून येत आहेत. ते म्हणतात राजकिय हालचालीत मग्न झाले सगळेच पक्ष,निवडणूकीच्या तोंडावरच जाते फक्त मतदारांवर लक्ष,त्यांचे आता तुमच्यावर लक्ष आसले तरी पाच वर्ष आपल्यावर लक्ष ठेवणाऱ्या उमेदवाराला विजयी करा,जातपात वंश परंपरा मोडीत काढा माणूसकी जात जोपासा व आपल्या अडचणीत व संकटात येणाऱ्या निष्ठावान उमेदवाराला विजयी करण्याचे ते साकडे घालतांना दिसत आहेत.
  ते कोणत्याही पुढाऱ्याला आवाहन देत नाहीत त्यांच प्रबोधन लोकशाही जिवंत ठेवून मतदान घडवून आणणे व चारिञ्य संपन्न उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन ते करत आसल्याने कोणत्याही नेत्याची सभा आसली तरी राऊत पायी फिरुन त्यांच प्रबोधन सुरु आसल्याने त्यांच्या प्रबोधनाबाबत कुतूहल निर्माण होतांना दिसून येत आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget