नेवासा, (प्रतिनिधी)
लोकशाहीमध्ये जय - पराजय हा ठरलेला आसतो पराभवामुळे खचून न जाता जनतेच्या ऋणात राहून ८५ हजार लोकांनी निवडणूकीत विश्वास दाखवला त्यांच्या विश्वासाला तडा न लागू देता सदैव त्यांच्या पाठीशी राहून पुढील वाटचाल करण्याची व्युहरचना माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केली आसून शनिवार (दि. २ रोजी) देवगांव येथे त्यांच्या निवासस्थानी दिवाळीच्या फराळ कार्यक्रमाचे आयोजन केली आहे.तर विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांनी शुक्रवार (दि.१) रोजी सोनईतही फराळ कार्यक्रम आयोजित करुन जनतेच्या ऋणात राहण्याची राजनिती आखल्यामुळे आगामी काळात आजी - माजी आमदार राजकारणात सक्रिय राहण्याचे संकेत दिवाळी फराळातून स्पष्ट होतांना दिसत आहेत.
माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्याकडे जनाधार नसतांना केवळ गडाखांवर नाराजी म्हणून मागील निवडणूकीत मुरकुटेंचा विजय झाला शुन्यातून विश्व निर्माण करुन त्यांनी विकास कामाचा डोंगर उभा केला. तर गडाख यांनी या निवडणूकीत जनता - जनार्धन हीच आपली कवचकुंडल समजून कार्यकर्त्यांवर विश्वास दाखवून सत्तेचे गणित जळवून घेतले.शंकरराव गडाख यांचा स्पष्टोक्ता सभाव जनतेला भावला.त्यामुळेच गडाखांनी बाजी मारली.गडाखांनी - मुरकुटेंवर खालच्या स्थरात जावून टिका केली नाही मुरकुटे अन् युवानेते प्रशांत गडाख यांच्यात टिकेचे शितयुद्ध चांगलेच रंगले होते. माञ निवडणूक झाल्यानंतर युवानेते प्रशांत गडाख यांनी पराभत उमेदवार मुरकुटेंसह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे,उद्सोगपती प्रभाकर ससे यांची भेट घेतली. तर विजयी आमदार गडाख यांनी मी सुद्धा मागचे विसरलो आसल्याची मार्मिक प्रतिक्रिया दिली. असे आसतांना आजी - माजी आमदारांनी दिवाळी फराळ आयोजित करुन पुन्हा रणांगण सक्रिय ठेवणार आसल्याचे या फराळातून अस्पष्टरित्या संकेत दिले आहेत.

Post a Comment