शुभम एन.जठार - विसापूर
श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील आठवडे बाजार तळाची दुरावस्था झाल्याने विक्रेत्यांसह बाजारकरुंना पावसाळ्यात मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.रविवारी पावसाची संततधार असल्याने दिपावलीचा बाजार असताना बाजारकरुंचे प्रचंड हाल झाले.
विसापूर येथील आठवडे बाजारासाठी विसापूर परीसरातील पिंपळगाव पिसा , निंबवी, एरंडोली,कोंडेगव्हाण,कोरगव्हाण,सारोळा सोमवंशी,चांभुर्डी,उखलगाव,सुरेगाव,घुटेवाडी, मुंगुसगाव या गांवासह पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद,कडुस,पाडळी,भोयरे गांगर्डा, बाबुर्डी,रुई छत्रपती,पिंपरी गवळी अदी विस गावतील लोक बाजार हाट करण्यासाठी येतात.मात्र बाजारला ओटे व्यवस्थित नाहीत.या बाजारतळावर १९९२ साली विसापूर ग्रामपंचायतीवर पंंचायत समितीचे विस्तार अधिकारी ननवरे हे प्रशासक असताना बाजार ओटेे बांधण्यात आले.तेही बाजारकरु रांगेत बसतील असे न बांंधता तत्कालीन पद्धतीने कट्टे तयार करण्यात आले.मात्र बाजारकरुंकडुुन गेल्या सत्तावीस वर्षात याकट्टयांचा फारसा वापर केला गेेला नाही.त्या कट्टयांची मोडतोड झालेली आहे. शेतकरी व विक्रेत्यांना आपला माल घेेऊन चिखलात बसावे लागते.पडझड झालेेले ओट्यांचे दगडही जसेच्या तसेच पडुन आहेत.ते दगड जमा करून इतरत्र हलवण्याची तसदीही ग्रामपंचायतीने घेेेतली नाही.ग्रामपंचायतीला या आठवडे बाजारातुन दर वर्षी दोन ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.त्या उत्पन्नातुन दर वर्षी काही निधी खर्च करून ग्रामपंचायतीनेे बाजार तळाची देखभाल करणे आवश्यक आहे.मात्र ग्रामपंचायत फारसे लक्ष देेेताना दिसत नाही.
आठवडे बाजारचे नवीन ओटे बांधकाम करणे व सुशोभीकरण करण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे.मात्र शासनाकडून अद्याप या प्रस्तावास योग्य प्रतिसाद मिळाला नसुन त्यास मंजूरी मिळावी यासाठी प्रयत्न चालू आहेत.
---- अरविंद जठार,सरपंच , ग्रामपंचायत विसापूर

Post a Comment