पिंपळगाव पिसा येथे कार्यकर्त्यांशी साधला संवाद.
विसापूर
माझ्या व्यक्तीगत कारणांसाठी केवळ या विधानसभा निवडणुकीत माघार घेतली म्हणजे मी राजकारण सोडून दिले असा गैरसमज कोणीही करुन घेऊ नये असे आवाहन आमदार राहुल जगताप यांनी केले आहे.पिंपळगाव पिसा ता.श्रीगोंदा येथे त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी आ.जगताप बोलत होते.
या वेळी आ.जगताप पुढे म्हणाले की, कर्मयोगी स्व.कुंडलीकराव तात्या जगताप यांनी मोठ्या परिश्रमाने कुकडी साखर कारखान्याची उभारणी केली.तो कारखाना मधल्या काळात अडचणीत आला.शेतकऱ्यांचे एफआरपी प्रमाणे देणे बाकी होते.ते सर्व देणे कारखान्याने मागील पंधरा दिवस पुर्ण दिलेले आहे.काही लोकांची देणी चुकते करण्याची प्रक्रिया चालू आहे.साखर कारखाना ही शेतकरी,सभासद व कामगारांची कामधेनु आहे.पाच वर्षे कारखान्याकडे लक्ष देऊन तो अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करत असताना कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.विरोधकांनी माझी चिंता करु नये पुढील निवडणुकीत मी आहेच. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार घनश्याम शेलार यांना निवडुन आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले.विरोधकांनी माझ्या विरोधात वेगवेगळ्या चर्चा सुरू केल्या आहेत.इडीची भिती माझ्या सारख्या कर्यकर्त्याला वाटण्याचे काही कारण नाही.माझे दोन तीन खाजगी साखर कारखाने नाहीत.चाळीस कोटींची हवेली नाही. एमआयडीसीत जमीन घेतलेली नाही मग मला भिती कशाची असा टोला त्यांनी माजी मंत्री पाचपुते यांचे नाव न घेता लगावला.यावेळी जेष्ठ नेते बाबासाहेब भोस म्हणाले की,अगदी तरुण वयातील एखाद्या विद्यमान आमदाराने स्वतःहून उमेदवारी नाकारुन दुसऱ्याला संधी देणारे आमदार राहुल जगताप यांच्या व्यतिरिक्त राज्यात दुसरे उदाहरण नाही.या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार घनश्याम शेलार म्हणाले की,एकीकडे शेतकऱ्यांना वेळेत बिल देता आले नाही मात्र नंतर दिले असतानाही आमदार राहुल जगताप उमेदवारी नाकारतात.मात्र दुसरीकडे पस्तीस वर्षे सत्ता उपभोगुन समाधान झाले नाही.पाच वर्षापूर्वी शेतकऱ्यांचे पैसे बुडवले म्हणून पराभूत झाले.आद्याप त्या लोकांना पैसे दिले नाही तरी या निवडणुकीत उभे रहाणारे उमेदवार आहेत.या वेळी माजी सभापती अरुणराव पाचपुते,दिपक भोसले,एकनाथ बारगुजे,मीनाताई आढाव,सचिन जठार,भाऊसाहेब इथापे,रामदास कानगुडे,शांताराम पोटे यांच्या सह नगर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Post a Comment