विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस दल सज्ज

जामखेड | प्रतिनिधी 
जामखेड तालुका पोलिस दलाच्या वतीने शनिवारी जामखेड शहर, खर्डा शहर, नान्नज व जवळा या चार ठिकाणी पथसंचलन करण्यात आले. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हे पथसंचलन करण्यात आले. यावेळी 4 अधिकारी व 100 कर्मचारी या पथसंचलनात सहभागी झाले होते.

जामखेड पोलिस दलाच्या वतीने जामखेड पोलिस स्टेशनपासून मेनपेठ नगररोड बसस्थानक परिसरात पथसंचलन करण्यात आले. त्यानंतर दुपारी खर्डा शहरात दाखल झालेल्या टिमने खर्डा पोलिस चौकीपासून खर्डा शहरातील विविध गल्ल्यांमध्ये जात खर्डाबसस्थानक परिसरापर्यंत पथसंचलन करण्यात आले.जवळा व नान्नज या गावांमध्ये शनिवारी सायंकाळी पाच नंतर पथसंचलन करण्यात आले. नान्नज पोलिस दूरक्षेत्रापासून पथसंचलन सुरू करण्यात आले पुढे नान्नज गावातून बसस्थानक परिसरापर्यंत पथसंचलन करण्यात आले.त्यानंतर सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास जवळा गावात पोलिसांचे पथक दाखल झाले. या पथकाने जवळा गावातील करमाळा चौक ते ग्रामपंचायत या भागापर्यंत पथसंचलन आले. या पथसंचलनात 4 अधिकारी, सिमा सुरक्षा दलाचे 50 कर्मचारी, जामखेड पोलिस स्टेशनचे 25 कर्मचारी, 25 होमगार्ड असा एकूण 104  कर्मचा-यांचा समावेश होता. पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, निलेश कांबळे, सिमा सुरक्षा बलाचे यादवसिंग तागड यांनी या पथसंचलनाचे वेगवेगळ्या भागात नेतृत्व केले. जामखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संवेदनशील ठिकाणी प्रशासनाने पथसंचलन करत निवडणूकीच्या काळात गडबड करणार्या प्रवृत्तींविरोधात धडक कारवाई करण्यास प्रशासन सज्ज असल्याचा सुचक इशारा या पथसंचलनातून देण्यात आला आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget