कॉ.आबासाहेब काकडे पुण्यस्मरण कार्यक्रम संपन्न

बोधेगाव वार्ताहर 
बोधेगाव येथे  आबासाहेब काकडे बी.फार्मसी कॉलेज,डी.फार्मसी कॉलेज व कला,शास्त्र व बी.सी.ए. महाविद्यालय शैक्षणिक संकुलात कॉ.आबासाहेब काकडे यांचा ४१ वा पुण्यस्मरण कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे डॉ.प्रमोद जाधव,मा.सुरेशभाई छाजेड, डॉ.पालिकडवाल,समन्वयक प्रा.शिवाजीराव लांडे, प्राचार्य, डॉ.एम.के.फसले, प्राचार्य,मोकाटे सर, उपप्राचार्य, भरत जाधव उपस्थित होते.
             कार्यक्रमात कॉ.आबासाहेबांच्या  जीवनावर एकूण कार्यावर प्रकाश टाकत सर्वांनी त्यांचे सामाजिक,  शैक्षणिक व राजकीय कार्य स्पष्ट केले.
प्राचार्य डॉ.एम.के.फसले यांनी प्रास्ताविक करतांना  सांगितले की,आबासाहेबांना त्यावेळी मोठी दूरदृष्टी होती.शैक्षणिक चळवळीतील त्यांचे योगदान महत्वाचे आहे.सामाजिक, शैक्षणिक कार्यात काळाची पावले ओळखणारे ते होते.गरिबांचे वकील म्हणून ते प्रसिद्ध होते. 
प्राचार्य राजेश मोकटे म्हणाले आबासाहेबांनी  नेहमी चांगले मित्र चांगले संत जोडले होते संत गाडगेबाबांचा सहवास त्यांना लाभलेला होता. शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडलेला होता.आबासाहेबांनी समाजसेवेचे व्रत घेतले होते.आबासाहेब आयुष्यभर लाल सुर्यप्रमाणे जगले 
         डॉ.प्रमोद जाधव म्हणाले बोधेगावसारख्या ठिकाणी एवढे मोठे शैक्षणिक संकुल उभारून खऱ्या अर्थाने संस्थेने बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले आहे. येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारून अंधश्रद्धा बाजूला केल्या पाहिजेत.
    प्रा.शिवाजीराव लांडे म्हणाले मी, स्वतः बाबासाहेबांना पाहिलेले आहे व त्यांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतले आहे. बाबासाहेबांची वैचारीक बैठक मोठी होती.त्यांनी प्रसिद्धीसाठी आंदोलने केली नाहीत आंदोलनाचा समाजाला त्रास होत काम नये. असे त्यांचे मत होते.त्यांनी वसतिगृह सुरू करून मागास विद्यार्थ्यांचे हित पाहिले शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे कार्य व योगदान महान आहे तेच कार्य काकडे कुटुंब पुढे चालवत आहे.
      अध्यक्षीय भाषणात मा.सुरेशजी छाजेड यांनी आबासाहेबांच्या शैक्षणिक कार्याचे महत्व सांगितले. आपल्या कामावर त्यांची मोठी निष्ठा होती, समाजाच्या विकासासाठी आबासाहेबांनी सर्व काही केले त्यांचा आदर्श समोर ठेऊन आपण सर्वांनी वाटचाल करावी.
     कार्यक्रमात कु. निकिता विखे, अर्चना गरड, व प्रतीक्षा वावरे या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी तीनही महाविद्यालयातील सर्व शिक्षक,कर्मचारी, व  विद्यार्थिनी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.कैलास पोटे व प्रा.रोहिणी खेडकर यांनी केले तर उपप्राचार्य भरत जाधव यांनी आभार मानले.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget