भाविकांना दुर्गा अनुभूती पुस्तकाचे मोफत वाटप
नेवासा(प्रतिनिधी)
नवरात्रीच्या उत्सवा निमित्ताने नेवासा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नवमीच्या होमहवन कार्यक्रमाला श्री दुर्गादेवी मंदिरात भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला संबळाच्या निनादात यावेळी महाआरती करण्यात आली.यावेळी दीपक शिंदे लिखित दुर्गा अनुभूती या पुस्तकाचे भाविकांना मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी दुर्गादेवी मंदिराच्या सभामंडपात झालेल्या होमहवन कार्यक्रमाप्रसंगी मंदिर पुजारी सुभाष चव्हाण यांचे चिरंजीव विठ्ठल चव्हाण व सौ.रुपाली चव्हाण यांच्या हस्ते होमहवनासह गणेश पूजन व नवग्रह पूजन करण्यात येऊन समिधा टाकून होमकुंड प्रज्वलित करण्यात आला
यावेळी झालेल्या होमहवन कार्यक्रमाचे पौरोहित्य वेदशास्त्रसंपन्न आचार्य युवा पुरोहित निखिल गुरू जोशी व राक्षसभुवन येथील वेदशास्त्र पंडित यांनी केले.यावेळी मुख्य दुर्गादेवीची आरती संत सेवक दीपक शिंदे व सौ.शिंदे
यांच्या हस्ते तर माहूरगड निवासिनी रेणुकामातेची आरती विठ्ठल चव्हाण व सौ.रुपाली चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आली उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी दुर्गा अनुभूती या पुस्तकाचे प्रकाशक दीपक शिंदे यांचा गौरव मंदिर व्यवस्थापण समितीच्या वतीने पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सत्काराद्वारे केला.यावेळी विश्वस्त सुधीर जामदार,राजेंद्र महाजन,शशिकांत नळकांडे,राजेंद्र पठाडे,विलास शिंदे,मंदिर पुजारी सुभाष चव्हाण,दीपक परदेशी,अजय पठाडे,तेजस पठाडे यांच्या सह दुर्गादेवी तरुण मंडळाचे कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment